Advertisements
Advertisements
प्रश्न
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली. अभ्यासासाठी त्यांनी इतके संदर्भग्रंथ मिळवले होते की त्या ग्रंथसंग्रहाला अभ्यासाचा डोंगर म्हणणेच योग्य ठरेल. त्यांनी कादंबरीलेखनासाठी केलेला अभ्यास पाहून कोणीही अवाक् होईल. अक्षरशः अगणित संदर्भग्रंथ त्यांनी जमवले आणि त्यांचा कसून अभ्यास केला. आपण लिहित असलेल्या कादंबरीतील सर्व घटना, व्यक्ती आणि त्यांच्या संबंधांतील सर्व तपशील यांची त्यांनी कसून तपासणी केली. कादंबरीतला काळ, त्या काळातील समाजातील खरेखरे वास्तव, त्या काळातील माणसे, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, रीतिरिवाज हे सर्व त्यांनी चिकित्सकपणे अभ्यासणे. इतिहास काळात जे खरोखरच घडले असेल तसे वातावरण आपल्या कादंबरीत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कधी कधी असेही घडायचे की एकच घटना दोन विरुद्ध पद्धतींनी सांगितली गेलेली असायची. अशा वेळी कोणते वर्णन खरे मानायचे, हा यक्षप्रश्नच असे. अशा वेळी माणसे खरोखर कशी वागत असतील, कशी बोलत असतील, याचा ते अंदाज बांधत. त्यासाठी स्वतःला असलेल्या मनुष्यस्वभावाच्या अभ्यासाचा उपयोग करीत. अशा प्रकारे अत्यंत चिकित्सकपणे, तटस्थपणे घटनांचा शोध घेत. स्वतःच्या कादंबरी लेखनासाठी ते अमाप कष्ट घेत असत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
