मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. प्रसारमाध्यमांची आवश्यकता - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

प्रसारमाध्यमांची आवश्यकता

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते

  1. प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते.
  2. प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो.
  3. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते.
  4. प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत.
shaalaa.com

उत्तर २

१. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल (इंटरनेट) ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची प्रसारमाध्यमे असून लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी, तसेच माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

२. वर्तमानपत्रांमधून वर्तमान घडामोडी, तसेच काही सदरांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक घटना समजतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही वर्तमानपत्रांशी जोडले जातात.

३. वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला 'प्रत्यक्ष काय घडले' हे दाखवण्यास दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम प्रभावी ठरते.

४. आकाशवाणीतर्फे विविध बोलीभाषांमध्ये मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ३७
एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ (ब) २.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×