मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

ग्. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर वर्तमानपत्रे सुरू झाली व ती माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराची साधने झाली.

ग्ग्. स्वातंत्र्यपूर्वकाळातील काही नेत्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात माहितीचा प्रसार करून जनतेला जागृत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले.

अ. 'दर्पण' या अंकाने तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती लोकांसमोर मांडली.

ब. 'ज्ञानोदय' या वर्तमानपत्राने '१८५७ च्या संघर्षा'च्या बातम्या छापल्या.

क. बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून मांडली गेली.

ड. 'केसरी' आणि 'मराठा' या वर्तमानपत्रांनी तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.

यावरून असे म्हणता येते, की वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. ५.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×