मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानेस्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.
लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

दिनांक: 14 डिसेंबर, 2022

प्रति,
मुख्याध्यापक
जनता विद्यालय
अहमदनगर

विषय: जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रवेशाबाबत.

माननीय मुख्याध्यापक,

आपण आपल्या शाळेमध्ये जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल मी अभय दळवी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले आभार मानतो. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने या स्पर्धेत इ. 10वीं - अ या वर्गातील वीस विद्यार्थी सहभाग घेऊ इच्छितात.

हे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत तसेच त्यांची चित्रकला पण खूप चांगली आहे. अभ्यास सांभाळून ते या कलेकडे लक्ष देतात. तेव्हा या विद्यार्थ्यांना आपण आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाल्यास स्पर्धेमुळे त्यांच्यातील कलेच्या ज्ञानामध्ये भर पडेल व पुढील जीवनात हे ज्ञान उपयोगी पडेल.

तरी मी अभय दळवी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो की या विद्यार्थ्यांना आपल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यावे.

कळावें,

आपला नम्र,
अभय दळवी,
विद्यार्थी प्रतिनिधी,
जनता विद्यालय,
अहमदनगर
E-mail - [email protected]
मोबाइल - 0211556680

shaalaa.com
पत्रलेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.


1. पत्रलेखन:

पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा


पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.


पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.


पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
व
पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व
स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी
आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]

श्रेया/श्रेयस इनामदार, संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.


वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.


संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा. 


तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


‘झाडे लावा........ झाडे जगवा.’

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×