मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी
आयोजित
स्पर्धा - दि. 20 मार्च वेळ - स. 9 वाजता
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण सोहळा
प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे
अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन
स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी
संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी.
E-mail - [email protected]
विनय/विनया देशमुख
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व
स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी
आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा.
लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

दिनांक - 12 मार्च 2022

प्रति,
मा. आयोजक,
साहित्य सेवा वाचनालय,
साखरवाडी,
कोल्हापूर - 416012

विषय - वक्तृत्व स्पर्धेत नाव नोंदवण्याबाबत.

महोदय,

मी विनया देशमुख, सरस्वती विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र आपणांस लिहीत आहे. आपल्या साहित्य सेवा वाचनालयाद्वारा आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या विद्यालयातील पाच विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. आपण या स्पर्धेसाठी त्यांची नावे नोंदवून घ्यावीत व त्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:

नाव इयत्ता
सुमित पाटील आठवी 
रमेश देशमुख नववी
संकेत पवार नववी
तेजल कदम आठवी
निशा सावंत नववी

आपण दिलेल्या वेळेपूर्वी हे सर्व विद्यार्थी हुतात्मा सभागृहात हजर राहतील. आपण आमच्या विनंतीचा नक्की विचार कराल असा विश्वास आहे.

कळावे,

आपली कृपाभिलाषी,
विनया देशमुख,
विद्यार्थी प्रतिनिधी,
सरस्वती विद्यालय,
विजयनगर,
कोल्हापूर - 416012
[email protected]

shaalaa.com
पत्रलेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

1. पत्रलेखन:

पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. उत्तम कांबळे यांना उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.


पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय, संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’ तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी, स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

संत गाडगेबाबा विद्यालय,
संतभूमी चौक, अमरावती.
शाळेच्या ‘विद्यार्थी मंडळ’
तर्फे आयोजित
‘एकपाती अभिनय स्पर्धा’
दि. 3 जानेवारी  स. 11 वा.
[email protected]
               - मुख्याध्यापक

अशोक/आशा पवार, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती/सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित
गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं
गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं
स्पर्धेचे ठिकाण
आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह,
बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा
दि. 14 नोव्हेंबर

वेळ - सकाळी 9.00 ते 11.00
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा

- मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

‘स्वच्छता हीच देशसेवा’

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम

दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता

शालेय परिसर स्वच्छता

विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!

  • दिनांक: ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर, २०१८
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
  • सूचना: शाळांनी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
सहल प्रमुख या नात्याने
 तुमच्या शाळेला परवानगी मिळण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा.

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

स्थळ

गोखले नाट्यगृह,
मिरज

रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त

ऐतिहासिक नाट्य स्पर्धा

दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८

वेळ - रात्री: ९:३० ते १२:३०

प्रवेश - फक्त पासधारक*

नियम व अटी लागू.

नावनोंदणी
आवश्यक

तुमच्या नाटकासाठी
वरील स्पर्धेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पत्र लिहा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जनता विद्यालय

अहमदनगर

आयोजित

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता.

संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय,

अहमदनगर.

E-mail - [email protected]

मोबाइल - 0211556680

अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.


विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.


तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.


‘झाडे लावा........ झाडे जगवा.’

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.


'झाडे लावा........ झाडे जगवा. '

हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

रोपांचे मोफत वाटप

संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे

[email protected]

कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×