मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

चौकटी पूर्ण करा. कष्टाने मिळणारे - ______ घामातून फुलणारे - ______ आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा i. सुखलोलुप झाली काया म्हणजे _____ ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने _____

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. कष्टाने मिळणारे - ______
  2. घामातून फुलणारे - ______

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. (2)

i. सुखलोलुप झाली काया म्हणजे ______

(अ) सुखाचा तिरस्कार वाटतो.
(ब) सुखाबद्दल प्रेम वाटते.
(क) सुखाचे आकर्षण वाटते.
(ड) सुख उपभोगण्याची सवय लागते.

ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______

(अ) काया सुखलोलुप होते.
(ब) पाखराला आनंद होतो.
(क) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(ड) आकाशाची प्राप्ती होते.

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

4. काव्यसौंदर्य (2)

‘आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा’

या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

आकलन
Advertisements

उत्तर

1. 

  1. कष्टाने मिळणारे - फळ
  2. घामातून फुलणारे - मोती

2. 

i. सुखलोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते.

ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.

3. तुला देवाने पंख दिले आहेत, तर त्याचा वापर करून सामर्थ्याने विहार कर. दरी, डोंगर, हिरवी राने, नदी, सागर यांना तू ओलांडून जा.

4. 

कवी जगदीश खेबुडकर यांनी ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेत परिश्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ते सांगतात की, माणसाने सुरक्षिततेच्या आणि परावलंबित्वाच्या बंधनातून बाहेर पडावे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी, असा संदेश या कवितेतून दिला आहे.

कवी माणसाला उद्देशून सांगतात की, त्याचे सध्या असलेले सुरक्षित आणि ऐश्वर्यपूर्ण जीवन खरेतर परावलंबी आहे, जणू सोन्याच्या पिंजऱ्यात राहण्यासारखे. त्यामुळे, माणसाने हे बंधन सोडून मुक्तपणे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा आणि मोठी भरारी घ्यावी. कवितेत पाखराच्या प्रतीकाचा वापर करून, कवीने मानवाला स्वसामर्थ्याची जाणीव करून दिली आहे.

shaalaa.com
आकाशी झेप घे रे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______


तुलना करा.

पिंजऱ्यातील पोपट  पिंजऱ्याबाहेरील पोपट
______ ______
______ ______
______ ______

पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.


कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.

____________

____________ 


‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.


‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.


‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)

खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

क्र. प्रश्न उत्तर
कवी किंवा कवयित्रीचे नाव.  
कवितेचा विषय.  
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा  
कवितेतून मिळणारा संदेश.  
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.  
कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.  

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

खालील पंक्तींचे रसग्रहण करा.

‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×