Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –
Advertisements
उत्तर
माणुसकीची शिकवण
त्यादिवशी वरद घरी आला तो उड्या मारतच. त्यांच्या जिल्ह्यामध्ये लवकरच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होणार होती. क्रिडास्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा होती. वरद हा एक उत्तम धावपटू असल्यामुळे शाळेतर्फे वरदने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असं मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. वरदने दुसऱ्या दिवशीपासूनच स्पर्धेचा सराव सुरू केला.
वरदच्या घराजवळ राहणारा तनय हा देखील उत्तम धावपटू होता आणि तोही त्याच्या शाळेमधून आंतरशालेय क्रीडास्पर्धेमध्ये भाग घेणार होता. आपण तनयला नक्कीच हरवू आणि पहिला क्रमांक मिळवू असा वरदला आत्मविश्वास होता आणि त्यासाठी तो भरपूर मेहनतही करत होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. वरद, तनय आणि आणखी दोन मुलांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा होती. वरद जीव तोडून धावत होता आणि अचानक तनयचा पाय मुरगळला. तनय पटकन खाली बसला. वरदच्या हे लक्षात आलं. मागचापुढचा विचार न करता त्याने स्पर्धा सोडून तनयकडे धाव घेतली. त्याला उठायला मदत केली आणि हळूहळू आधार देऊन धावपट्टीच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसवलं. तनयचे शिक्षक आणि क्रीडास्पर्धेचे आयोजक हे सगळं बघत होते. तनयचे शिक्षकही धावत मदतीला आले.
तनय आणि वरद दोघेही स्पर्धेतून बाद झाले आणि दुसरा एक मुलगा स्पर्धा जिंकाला. आपण जिंकू शकलो नाही या विचारांनी वरदच्या डोळयामध्ये पाणी आलं; पण तेवढ्यात अचानक त्याच्या नावाचा पुकारा झाला. स्पर्धेचे आयोजक बोलत होते, या धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस एका धावपटूने मिळवले असले, तरी या संपूर्ण क्रीडास्पर्धेमध्ये अव्वल ठरलेला एक खेळाडू म्हणून आज मी वरदचं नाव घोषित करतो. स्पर्धेपेक्षा देखील माणुसकी महत्वाची असते ही एका अतिशय महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला वरदने शिकवली. आयोजकांचे शब्द संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धा हरल्याचं दु:ख वरद विसरला. स्पर्धा जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुसऱ्याची मदत करण्यातला आनंद मोठा आहे हे आज त्यालाही उमगलं होतं.
तात्पर्य: माणुसकीचा विचार करून एकमेकांना मदत करणे हा सर्वांत मोठा गुण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.
| मैत्री → | दप्तर → | गृहपाठ → | रस्ता |
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.
खालील कथालेखन करा.
रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.
खालील कथालेखन करा.
रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
एकीचे बळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रामाणिकपणाचे फळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
बुद्धी आणि ताकदीचा मेळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
अति तिथं माती
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
विज्ञानाची कास धरा
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
| तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________ |
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.
| हट्टी राजकन्या | त्याला अर्धे राज्य मिळते |
| `↓` | `↑` |
| राज्यकन्येची अट | शेतकऱ्याचा मुलगा येतो |
| `↓` | `↑` |
| न संपणारी गोष्ट सांगणे | बरेच जण प्रयत्न करतात |
| `↓` | `↑` |
| राज्यात दवंडी अर्धे राज्य | |
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
| प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
- कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.
पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.
मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -
