मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील शीर्षकावरून कथालेखन करा. एकीचे बळ

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

एकीचे बळ

रामगड नावाचं डोंगरात लहानसं गाव होतं. इतर वस्तीपासून हे गाव दूरच आणि उंचावर होतं. गावात शाळा नव्हती. गावातील काही मोजकीच मुलं आठ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जात. मुलींना तर घरातील लोक एवढ्या लांब पाठवायला तयार नसत. त्यामुळे, बरीच मुले शिक्षणापासून वंचित होती.

'अंकुर' हा त्याच गावातील लोहाराचा मुलगा. त्याला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण घरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या शाळेतून घेतले. पुढे शिष्यवृत्ती मिळवून शहरातील शाळेत वसतिगृहात राहून तो उच्चशिक्षित झाला. सरकारी शाळेत नोकरीत रुजू झाला. सारं काही सुखाचं झालं; पण अंकुरला आपल्या गावातील स्थिती स्वस्थ बसू देईना. त्याला काहीही करून गावात शाळा बांधायची होती. त्याने बरीच खटपट केली; पण कोणीही या गावात शाळा सुरू करण्याकरता त्याला मदत केली नाही. शेवटी अंकुरने एक निर्णय घेतला. आपली थोडीफार जमलेली जमापुंजी घेऊन तो गावी आला. गावात त्याने सगळयांना जमा करून आपण सगळे मिळून शाळा उभारू शकतो असा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. सुरुवातीला कोणालाच हे शक्य होईल असं वाटलं नाही; पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न केले, तर हे शक्य होईल हे अंकुरने सर्वांना पटवून दिले.

अंकुरने त्याची सगळी जमापुंजी शाळेच्या इमारतीसाठी दिली. त्याकरता तो स्वत: मेहनत करत होता. गावातील गवंड्याने त्याला मदत केली. वीटभट्टीच्या मालकाने बांधकामाकरता विटा देऊ केल्या. सुतार, लोहार, कुंभार, रंगारी अशा साऱ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला. गावातील प्रत्येक व्यक्ती जोमाने काम करू लागली. आबालवृद्ध सारे यात सहभागी झाले आणि पाहतापाहता शाळेची इमारत उभी राहिली. सर्व सुखसोईंनीयुक्त शाळा, त्यात अंकुरसारखा गुणी शिक्षक लाभल्याने गावकऱ्यांना खूप आनंद झाला. गावातली सारी मुलं आणि मुली रोज शाळेत जाऊ लागली. शिक्षणाने गावात हळूहळू समृद्धी आणली. अंकुरने तर प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केले. त्यामुळे, संपूर्ण गाव शिक्षणाच्या वाटेवर चालू लागले. एकीचे बळ असेल, तर आपण अवघड गोष्टीही साध्य करू शकतो हे सर्वांनाच पटले.

तात्पर्य: एकत्र काम केल्याने काम सोपे होते.

shaalaa.com
कथालेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. १.

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

मार्च २०२० ______ परीक्षा कालावधी ______ विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी ______ कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ______ सामाजिक परिस्थिती ______ विद्यार्थ्यांची निराशा ______ निकाल ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रामाणिकपणाचे फळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पळसाला पाने तीनच


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि ......................


दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

........................................................................................................................
........................................................................................................................
........................................................................................................................
................ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.


तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ........................................


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×