मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

जीवन: एक परीक्षा

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि म्हणाला, “आपल्या वाड्याच्या पश्चिमेकडे तीन खोल्या आहेत. मी तुम्हांला दिलेल्या पैशांतून तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानंही पूर्ण भरून दाखवायची.” व्यापाराची जबाबदारी घेण्याकरता उत्सुक असलेल्या मुलांना ही परीक्षा क्षुल्लक वाटली. तिन्ही मुलांनी आपापले पैसे घेतले व ते निघून गेले.

रमणलालचा मोठा मुलगा खूप खादाड होता. त्याला खाण्याची हौस होती. त्याने पैसे मिळताच हॉटेल गाठले. चमचमीत पदार्थ, मिठाई खाऊन तृप्त मनाने तो घरी आला. त्याला एवढे सारे पदार्थ खाऊन झोप येत होती. घरी येऊन त्याने पलंगावर अंग टाकले आणि तो झोपी गेला.

रमणलालचा दुसरा मुलगा विचार करत बसला होता. खोली कशाने भरावी याचे उत्तर सापडत नव्हते. एवढ्यात त्याला रस्त्यावरून गवताचे भारे घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दिसल्या. त्याने त्या स्त्रियांना थांबवले व त्यांच्याकडून गवत विकत घेऊन खोली गवताने भरू लागला; पण पैसे संपले तरीही खोलीचा निम्मा भाग मात्र रिकामाच राहिला.

संध्याकाळ होताच रमणलालने फेरफटका मारून आपल्या मुलांनी काय केले हे पाहायचे ठरवले. तो बाहेर आला. पहिल्या मुलाच्या खोलीकडे गेला. खोलीत अंधार होता आणि मुलगा घोरत पडला होता. दुसऱ्या मुलाची खोली गवताने अर्धी भरलेली पाहून रमणलाल तेथून पुढे निघाला. त्याने तिसऱ्या मुलाच्या खोलीकडे मोर्चा वळवला. त्या खोलीतून मंद मंद सुगंध दरवळत होता. खोली स्वच्छ केलेली होती. देवाचा फोटो लावून त्यापुढे दिवा लावून रमणलालचा मुलगा भजन करत होता. भक्तिमय वातावरणाने, दिव्याच्या प्रकाशाने व सुगंधाने संपूर्ण खोली भरलेली होती.

लगेच रमणलालने  आपला निर्णय जाहिर केला, की मी माझा व्यापार तिसऱ्या मुलाला सांभाळाला देतो आहे. इतर दोघांनी त्याच्या सोबत राहून शिका आणि त्याला मदत करा.

तात्पर्य: विचारपूर्वक कामे करुन कठीण कामेसुद्धा सहज होतात.

shaalaa.com
कथालेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. ४.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन ३ | Q आ. ४.

संबंधित प्रश्‍न

खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

एकीचे बळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

ऐकावे जनाचे करावे मनाचे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

अति तिथं माती


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

विज्ञानाची कास धरा


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आटपाट नगर - वृद्ध शेतकरी - आंब्याची रोपे - बागेत काम - राजा हिंडत बागेत - राजाची चौकशी - रोपे लावून फळे केव्हा - शेतकऱ्याचे उत्तर ऐकून राजाला आश्चर्य - शेतकऱ्याला बक्षीस.


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि ......................


दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

........................................................................................................................
........................................................................................................................
........................................................................................................................
................ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ........................................


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×