Advertisements
Chapters
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - अर्थनियोजन Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - अर्थनियोजन - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Advertisements
Solutions for Chapter 6: अर्थनियोजन
Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 अर्थनियोजन सरावसंच 6.1 [Page 98]
अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थांचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय चालू केला, त्यात त्याला 5% नफा झाला. तर मूळ भांडवलावर त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला?
निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला, 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा.
सय्यदभाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडीस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरिता गुंतवले. 2 वर्षांनंतर श्री फर्नांडीस यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यदभाई व श्री फर्नांडीस यांपैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली?
समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाजकार्यासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले. तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले. तर तिचे मासिक उत्पन्न काढा.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 अर्थनियोजन सरावसंच 6.2 [Page 106]
खालील सारणीचे निरीक्षण करा. सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा.
| अ.क्र. | व्यक्ती | वय | करपात्र उत्पन्न (₹) | आयकर भरावा लागेल किंवा नाही. |
| (i) | कु. निकिता | 27 | ₹ 2,34,000 | |
| (ii) | श्री कुलकर्णी | 36 | ₹ 3,27,000 | |
| (iii) | श्रीमती मेहता | 44 | ₹ 5,82,000 | |
| (iv) | श्री बजाज | 64 | ₹ 8,40,000 | |
| (v) | श्री डीसिल्व्हा | 81 | ₹ 4,50,000 |
श्री कर्तारसिंग (वय 48 वर्षे) खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी 12000 रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे, तर त्यांच्या आयकराचे गणन करा.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 अर्थनियोजन संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [Page 107]
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
विविध प्रकारच्या गुंतवणुकींपैकी 80C कलमांनुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते?
दीड लाख रुपये
अडीच लाख रुपये
एक लाख रुपये
दोन लाख रुपये
एका व्यक्तीने 2017−18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते?
2016−17
2018−19
2017−18
2015−16
श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्यांच्याकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढा.
श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. श्री रमणिकलाल यांनी 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशार झाली?
एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते. त्यामध्ये 56,000 रुपयांची भर घातली व ती सर्व रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. तर 3 वर्षांनंतर एकूण किती रक्कम परत मिळेल?
श्री मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचा 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि 30% भाग धाकट्या मुलास दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्यांच्याकडे 1,80,000 रुपये उरले. तर श्री मनोहर यांचे उत्पन्न काढा.
कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे. त्याचे उत्पन्न 36% वाढले तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला. तर त्याची आता होणारी शेकडा बचत काढा.
रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न 8,07,000 रुपये आहे. ते तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात. जर त्यांच्या बचतींचे गुणोत्तर 16 : 17 : 12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा.
खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.
श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे.
खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.
श्री खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे.
खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.
कु. वर्षा (वय 26 वर्षे) यांचे करपात्र उत्पन्न 2,30,000 रुपये आहे.
Solutions for 6: अर्थनियोजन
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - अर्थनियोजन Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - अर्थनियोजन - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - अर्थनियोजन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (अर्थनियोजन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 अर्थनियोजन are बचत व गुंतवणूक, करआकारणी, आयकर, आयकर आकारणी, अर्थनियोजनाची ओळख.
Using Balbharati गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions अर्थनियोजन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 6, अर्थनियोजन गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
