Please select a subject first
Advertisements
Advertisements
पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:
हे पेन काहीसं वजनदार आहे.
Concept: व्याकरण
पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:
इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.
Concept: व्याकरण
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:
| वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ | ||
| (i) | भांबावून जाणे | (१) | खूप प्रेम करणे |
| (ii) | जिवापाड प्रेम करणे | (२) | गोंधळून जाणे |
| (३) | आकर्षित करणे | ||
Concept: वाक्प्रचार व म्हणी
समानार्थी शब्द लिहा:
चित्त - ______
Concept: शब्दसंपत्ती >> समानार्थी शब्द
समानार्थी शब्द लिहा:
मेघ - ______
Concept: शब्दसंपत्ती >> समानार्थी शब्द
पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:
मिरवणूक
Concept: व्याकरण
खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:
कठीण/कठीन/कठिण/कटीन
Concept: व्याकरण
खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा:
| विरामचिन्हे | विरामचिन्हांची नावे |
| ? | ______ |
| . | ______ |
Concept: विरामचिन्हे
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
| मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. |
- आकृतिबंध पूर्ण करा: (2)

- टीप लिहा: (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
Concept: अपठित गद्यांश
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | 'अंकिला मी दास तुझा' |
| 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| 2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
| 3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' |
| 4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| 5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
Concept: अंकिला मी दास तुझा
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | योगी सर्वकाळ सुखदाता |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।। |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - | (i) उदक - |
| (ii) मधुर - | |
| (iii) तृषित - | |
| (iv) क्षाळणे - |
Concept: योगी सर्वकाळ सुखदाता
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)
- माता धावून जाते ______
- धरणीवर पक्षिणी झेपावते ______
- गाय हंबरत धावते ______
- हरिणी चिंतित होते ______
|
अग्निमाजि पडे बाळू। तैसा धांवें माझिया काजा। सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
२. कोण ते लिहा. (२)
- परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
- मेघाची विनवणी करणारा - ______
- भुकेलेले - ______
- भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______
३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)
४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)
Concept: अंकिला मी दास तुझा
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| कृती | ‘अंकिला मी दास तुझा’ |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - | ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’ |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ - | (i) माता - |
| (ii) कनवाळू - | |
| (iii) काज - | |
| (iv) धेनू - |
Concept: अंकिला मी दास तुझा
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्या वर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, ‘‘तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?’’ मी एका पायावर ‘हो’ म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दि ली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षि णेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या . थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्या च्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ याघटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्य क्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्य क्रमात सन्मा नाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ |
(१) कोण ते लिहा. ०२
- सभा, संमेलने गाजवणारे कवी -
- विश्वकोशाचे अध्यक्ष नात्याने वाईला जाणारे -
- लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे -
- मासे पकडण्याचा उद्योग करणारी -
(२) का ते लिहा. ०२
- बाळ रडत होते कारण....
- लेखकाने सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली कारण....
(३) खालील शब्दासाठी उताऱ्यात आलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
- वर × ______
- उद्धट × ______
- ओहोटी × ______
- कमी × ______
(४) स्वमत - ‘‘शाल व शालीनता पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ०२
Concept: शाल
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
-
उताऱ्यात आलेले नदीचे नाव -
-
बाळाची आई करत असलेला उद्योग -
|
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

(3) स्वमतः (3)
‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
Concept: शाल
उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
१. वैशिष्ट्ये लिहा: (२)
- कृष्णा नदीचा प्रवाह → ______
- टोपलीत ठेवलेले मूल → ______
- लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल → ______
- कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम → ______
|
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’ |
२. प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा: (२)
- सन्मानाची प्रतीके लिहा.
- पाचपन्नास रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात?
३. व्याकरण:
(i) गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा: (१)
(अ) ठेवणे, गुंडाळणे, शहाणे, गाजणे → ______
(ब) शाल, कृष्णा, पर्वत, नदी → ______
(ii) अनेकवचन लिहा: (१)
(अ) टोपली - ______
(ब) मासा - ______
४. स्वमत: (२)
लेखक - रा. ग. जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक 'उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Concept: शाल
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर. “तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.” “हो! म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.” |
1. कोण ते लिहा. (2)
- नेहमी तिरके बोलणारे - ______
- बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे - ______
2. कृती पूर्ण करा. (2)

3. पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)
Concept: उपास
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं !' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!'' अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. "दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!'' अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. |
(1) उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा. (2)
-
- ............................
- ............................
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
i. कार्डवर दाखवलेले वजन - ...........
ii.

(3) स्वमत:
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा. (3)
Concept: उपास
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) चौकटी पूर्ण करा. (2)
- मावशींचे राहण्याचे ठिकाण - ...........
- मावशींना लेकाने दिलेली भेट - ...........
- झोपडीपुढे लावलेले झाड - ...........
- निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली - ...........
|
‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’ ‘‘त्या टेकडीपल्याड’’, मावशी म्हणाल्या. ‘‘इथून किती कि. मी. आहे?’’ ‘‘तीन.’’ ‘‘तुम्ही कशा आलात इथपर्यंत?’’ ‘‘गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते’’, अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यांतलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. ‘‘आणि आता पाहा, या आहेत रेखामावशींच्या फूटप्रिन्टस...! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे ‘आ’ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली ... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले ... ‘सिल्व्हर फूटप्रिन्टस! दि मोस्ट क्लिन फूटप्रिन्टस!!’” ‘‘वाऽ पाह्यलंत रेखामावशींचे पाय चंदेरी आहेत.’’ |
(2) कोण ते लिहा. (2)
- रेखामावशींची माहिती घेणारा -
- चंदेरी पाय असलेल्या -
(3) स्वमत. (3)
‘ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम’ तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: फूटप्रिन्टस
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांडयांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?'' हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. "अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हायबक्कळ?”' "सॉरी, मावशी खरंच सॉरी,'' आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. |
- आकृती पूर्ण करा: (2)

- चौकटी पूर्ण करा: (2)
- दार उघडणारा - ______
- फरशी पुसणाऱ्या - ______
- अभिषेकचा आतेभाऊ - ______
- स्वच्छतेची भोक्ती - ______
- स्वमत:
'सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा' या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. (3)
Concept: फूटप्रिन्टस
