हिंदी

Marathi Official Board Paper 2024-2025 HSC Commerce (English Medium) 12th Standard Board Exam Question Paper Solution

Advertisements
Marathi [Official Board Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Commerce (English Medium)
HSC Science (General)
HSC Arts (English Medium)
HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 27th June 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना:

  1. आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात.
  2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग १ - गद्य
[20]
[8]१. (अ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) आनंद अनुभवण्याची निमित्तं -  (२)

(य) ............

(र) ............

(२) विधाने पूर्ण करा -  (२)

(य) आई-वडील खंतावतात, जेव्हा ............

(र) आपण आनंदाला पारख होतो, जेव्हा ............

पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो, तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाटी तर कितीही पैसे मिळाले, तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या, अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. २ × २ = ४ असा आनंदाचा गुणकार होतो; पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं, तरी गुणाकार शून्यच येणार.

यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद.

एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे; पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला, की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.

आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्त्व आहे - ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो, तेच क्षत्र निवडा. स्वत:च्या आवडीचं काम निवडा, केवळ आई-वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई-वडिलांच्या आनंदासाठी हे केलं; पण जेव्हा आई-वडिलांना जाणवतं, की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच.

(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)

‘एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगण आहे,’ या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

किंवा

खरा टिकाऊ आनंद मिळविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]१. (आ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) लेखकाच्या मते व्यंगचित्राच्या भाषेची वैशिष्ट्ये -  (२)

(य) ..........

(र) ..........

(२) फरक लिहा: (२)

(य) आईचं नातं ..........

(र) बाकीची नाती ..........

व्यंगचित्रं ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते.’ हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्‍त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही.

(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)

‘आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत लिहा.

किंवा

‘व्यंगचित्रांचे प्रभावीपण’ तुमच्या शब्दांत व्यक्त करा. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]१. (इ)

खालील उतार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) आकाशाचे कोणतेही दोन गुण लिहा.  (२)

(य) ..........

(र) ..........

आकाश अलिप्त आहे, निःसंग आहे तसेच मोकळे आहे. ते आपले पंख मिटत नाही. जणू अधिकच पसरते. आकाशाप्रमाणे मोकळे असावे. आत, गाठीचे काही नाही. लपवालपव नाही. छपवा छपव नाही. निःस्वार्थ मनुष्यच हे करू शकतो. कारण त्याला इतरांना वगळून काही मिळवायचे नसते. मोकळेपणा हवा असेल तर अधिकाधिक निःसंग, निःस्वार्थ व्हायला हवे. आकाशाजवळ काही नाही. ते केरकचरा, धूळ-धुरोळा जवळ ठेवीत नाही ; त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तार्‍यांनाही जवळ घेत नाही. धूळ नको, हिरे-माणकेही नकोत. अशी वृत्ती झाली म्हणजे मोकळेपणा येतो. मग सारे मित्र सर्वांना जवळ घेता येते. आकाशाला आपपर नाही. गरुडाने भरारी मारावी, चिमणीने भुरभुर करावी. सजल मेघाने लोंबावे, निर्जल मेघाने गर्जावे. सर्वांना प्रवेश सर्वांना परवानगी, सर्वांना जवळ घ्यायला अनंत हात सदैव सिद्धच आहेत!

आकाशाप्रमाणे मोकळे, व्यापक, निःसंग व्हावे असे मला वाटते.

(२) निःस्वार्थ मनुष्यच आकाशाप्रमाणे असू शकतो. (२)

कारण ..........

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग २ - पद्य
[16]
[8]२. (अ)

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) समुद्राची संचार स्थाने - (२)

(य) ..........

(र) ..........

(२) समुद्राने केलेल्या दोन मानवी क्रिया - (२)

(य) ..........

(र) ..........

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या. 
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून,
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो.
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवलं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

(३) अभिव्यक्ती: (४)

‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (आ)

खालील ओळींचा अर्थ लिहा:

‘रडू नकोस खुळे, ऊठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात 
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (इ) | खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
[4]२. (इ) (i) | काव्य सौंदर्य:

कणस भरूं दे जिवस दुधानें 
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]2. (इ) (ii) | रसग्रहण:

फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई
तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते.

वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ३ - साहित्यप्रकार: कथा
[10]३.
[4]३. (अ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:  

(य) अधिकाधिक लोकांना आकर्षित करणारी कथाकथनाची लोकप्रिय माध्यमे लिहा.  (१)

(र) कथावाचनाला इतर कलांची जोड दिल्यास श्रोत्यांवर होणारा परिणाम लिहा.  (१)

कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते.

अलीकडच्या काळात ‘कथाकथन’ क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करीत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.

अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते.

(२) कथाकथनाचे तंत्र अवगत करून घेण्यासाठी आवश्यक असणारे घटक लिहा.   (२)

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]३. (आ) | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[3]३. (आ) (य)

‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.

Concept: undefined - undefined
Chapter: [3.01] शोध
[3]३. (आ) (र)

गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [3.02] गढी
Advertisements
[3]३. (आ) (ल)

‘नर्स ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करायची धडपड करते,’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (आ) (व)

‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [3.02] गढी
विभाग ४ - उपयोजित मराठी
[14]
[4]४. (अ) | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[2]४. (अ) (१)

मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (अ) (२)

माहितीपत्रकाच्या रचनेची दोन वैशिष्ट्ये लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (अ) (३)

अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [4.03] अहवाल
[2]४. (अ) (४)

वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
[10]४. (आ) | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
[5]४. (आ) (१)

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीची पूर्वतयारी’ या विषयी लिहा:

मुलाखत म्हणजे .......... मुलाखतीचा पाया .......... ज्यांची मुलाखत घ्यावयाची त्यांच्या बद्दलची माहिती ........ मुलाखतीचे उद्दिष्ट ........... मुलाखतीचे माध्यम.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]४. (आ) (२)

खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.

Concept: undefined - undefined
Chapter: [4.02] माहितीपत्रक
[5]४. (आ) (३)

खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा:

अहवालाचे स्वरूप ............. अहवालाचा प्रारंभ ............. अहवालाचा मध्य ....... अहवालाचा शेवट .............. अहवालाची भाषा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]४. (आ) (४)

खालील मुद्द्यांच्या आधारे बातमीवर आधारित वृत्तलेख सोदाहरण स्पष्ट करा:

घटनाधारिति लेख ............. संदर्भांची माहिती ............. मुद्द्यांचे विश्लेषण ............. तज्ज्ञांचे सहकार्य ............. विषयाला मर्यादा नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ५ - व्याकरण व लेखन
व्याकरण घटक व वाकप्रचार
[20]५.
[10]५. (अ) | सूचनेनुसार कृती करा:
Advertisements
[1]५. (अ) (१) (य) | योग्य पर्याय निवडा:

माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -

माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.

माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.

माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.

Concept: undefined - undefined
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
[1]५. (अ) (१) (र) | सूचनेप्रमाणे सोडवा:

परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)

Concept: undefined - undefined
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
[1]५. (अ) (२) (य) | योग्य पर्याय निवडा.

‘नवरात्र’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.

विभक्ती तत्पुरुष समास 

कर्मधारय समास 

समाहार द्वंद्व समास

द्विगू समास

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (२) (र)

‘यथोचित’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (३) (य) | योग्य पर्याय निवडा:

‘मी खिडकी हलकेच उघडतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा:

भावे प्रयोग

कर्मणी प्रयोग

कर्तरी प्रयोग

यांपैकी नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (३) (र)

भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा:

सगळे खूष होतात.

आरशातल्या स्त्रीने मला विचारले.

हा संदेश मला पोहचवता आला.

मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (४) (य) | योग्य पर्याय निवडा:

‘आहे ताजमहाल एक जगती
तो तोच त्याच्यापरी’

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.

अर्थान्तरन्यास 

अतिशयोक्ती

अनन्वय 

अपन्हुती

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (४) (र)

न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।

या वाक्यातील उपमेय ओळखा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5.01] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
[1]५. (अ) (५) (य)

‘गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा:

गळा तोडणे

गळ्याशी येणे

विश्‍वासघात करणे

यांपैकी नाही

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (५) (र)

‘गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) | खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
[10]५. (आ) (१)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

संगणक साक्षरता: काळाची गरज

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (२)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

शेतकऱ्याचे मनोगत

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (३)

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर

Concept: undefined - undefined
Chapter: [5.02] लेखन : निबंधलेखन
[10]५. (आ) (४)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझा आवडता साहित्यिक

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (५)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अपघात

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam Marathi with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Marathi board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam.

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×