हिंदी

‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

वैदर्भी बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. ऐकताना मन प्रसन्न होते. कथेतील वर्णने कोरड्या तपशिलाने केली जात नाहीत. हृदय भाषेत ही वर्णने येतात. त्यामुळे भाषा वाचकांच्या मनाची पकड घेते. कथेत वाक्प्रचार व म्हणींचा मुबलक उपयोग केलेला आहे. किंबहुना बोलीभाषेचे हे वैशिष्ट्यच असते. यामुळे भाषा रसाळ झाली आहे.

भाषा गोड आणि रसाळ वाटण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिच्यातील ध्वनिमाधुर्य. नामे आणि क्रियापदांना लागणारे काही प्रत्यय याचे उत्तम उदाहरण आहेत. जसे – गावाले, त्याइच्या, त्याइने, त्याइले इत्यादी प्रत्यय. या शब्दांचा उच्चार अतिशय मृदू आणि मुलायम आहे. अशा प्रत्ययांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भाषा वाचताना किंवा ऐकताना मनही कोमल आणि प्रसन्न होते.

उदाहरणार्थ, प्रमाण मराठीतील ‘वाडा’ हा शब्द वैदर्भी बोलीत ‘वाळा’ असा होतो. तसेच ‘पडल्याने’ या शब्दाचे रूप ‘पळल्याने’ असे आढळते. या धर्तीवर अनेक उदाहरणे देता येतील. यावरून असे दिसते की वैदर्भी भाषेचा स्वभावच मुळात कोमल आणि मृदू आहे.

वैदर्भी भाषेतून प्रमाण मराठीत येताना मात्र ही गोडी काही प्रमाणात कमी होते. प्रमाण भाषेत आखीव-रेखीवपणा अधिक असल्यामुळे ती अधिक औपचारिक आणि थोडी कोरडी वाटते.

shaalaa.com
गढी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.02: गढी - कृती (७) [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 3.02 गढी
कृती (७) | Q 3 | पृष्ठ ८७

संबंधित प्रश्न

चौकटी पूर्ण करा.
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत - ____________


चौकटी पूर्ण करा.
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे - ____________


चौकटी पूर्ण करा.
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी - ____________


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि परबतराव


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि संपती


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
लक्ष्मी आणि बापू गुरुजी


खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
बापू गुरुजी आणि पाटील


कृती करा.
गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी


कृती करा.
बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये


कारणे लिहा.
गावतला जो तो आनंदात होता; कारण


कारणे लिहा.
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण


कारणे लिहा.
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण


थोडक्यात उत्तरे लिहा.
'पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं', असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
बोर्डींगमधला 'संपती' नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.


स्वमत:

बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.


गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत:
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.


'गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.


‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.


‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.


‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.


बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.


गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.


बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×