हिंदी

कणस भरूं दे जिवस दुधानें देठ फुलांचा अरळ मधानें कंठ खगांचा मधु गानानें आणीत शहारा तृणपर्णां वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कणस भरूं दे जिवस दुधानें 
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेत आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसाचे अत्यंत नादमय आणि ओघवत्या शब्दांत सुंदर चित्रण केले आहे. पावसामुळे निसर्गात घडणारे बदल त्यांनी भावपूर्ण शैलीत मांडले आहेत.

पाऊस थांबल्यानंतर थोडीशी ऊघडीप पडते आणि कोवळे ऊन जमिनीवर पसरते. त्या वेळी शेतात पोषक दुधाने भरलेली कणसे दिसू लागतात. फुलांचे देठ मधुरसाने ओथंबलेले असतात. पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने वातावरण आनंदी होते आणि त्या स्वरांनी गवताच्या पात्यांवरही जणू रोमांच उभे राहिल्यासारखे भासते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×