हिंदी

खालील उतार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) आकाशाचे कोणतेही दोन गुण लिहा. (२) (य) .......... (र) .......... आकाश अलिप्त आहे, निःसंग आहे तसेच मोकळे आहे. ते आपले पंख मिटत नाही. जणू अधिकच पसरते. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) आकाशाचे कोणतेही दोन गुण लिहा.  (२)

(य) ..........

(र) ..........

आकाश अलिप्त आहे, निःसंग आहे तसेच मोकळे आहे. ते आपले पंख मिटत नाही. जणू अधिकच पसरते. आकाशाप्रमाणे मोकळे असावे. आत, गाठीचे काही नाही. लपवालपव नाही. छपवा छपव नाही. निःस्वार्थ मनुष्यच हे करू शकतो. कारण त्याला इतरांना वगळून काही मिळवायचे नसते. मोकळेपणा हवा असेल तर अधिकाधिक निःसंग, निःस्वार्थ व्हायला हवे. आकाशाजवळ काही नाही. ते केरकचरा, धूळ-धुरोळा जवळ ठेवीत नाही ; त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तार्‍यांनाही जवळ घेत नाही. धूळ नको, हिरे-माणकेही नकोत. अशी वृत्ती झाली म्हणजे मोकळेपणा येतो. मग सारे मित्र सर्वांना जवळ घेता येते. आकाशाला आपपर नाही. गरुडाने भरारी मारावी, चिमणीने भुरभुर करावी. सजल मेघाने लोंबावे, निर्जल मेघाने गर्जावे. सर्वांना प्रवेश सर्वांना परवानगी, सर्वांना जवळ घ्यायला अनंत हात सदैव सिद्धच आहेत!

आकाशाप्रमाणे मोकळे, व्यापक, निःसंग व्हावे असे मला वाटते.

(२) निःस्वार्थ मनुष्यच आकाशाप्रमाणे असू शकतो. (२)

कारण ..........

आकलन
Advertisements

उत्तर

(१) आकाशाचे दोन गुण:

(य) अलिप्त

(र) नि:संग, मोकळे

(२) 

नि:स्वार्थ मनुष्यच आकाशाप्रमाणे असू शकतो; कारण तो कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही. त्याला इतरांना वगळून काही मिळवायचे नसते आणि तो सर्वांना समानतेने जवळ घेतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×