हिंदी

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १. एका शब्दात उत्तर लिहा. (२) थंडी कमी होण्याची वेळ- ______ लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. एका शब्दात उत्तर लिहा.  (२)

  1. थंडी कमी होण्याची वेळ- ______
  2. लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना - ______

     होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर; पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हांला गॅलरीत झोपायला मिळायचं.
     रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले, की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, 'उद्या कोकिळेचं 'कुहू' ऐकू येईल का? बघू हं!' पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो 'कुहूऽकुहूऽ' आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं.
     सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!

२. वैशिष्ट्ये लिहा.  (२)

लेखिकेने अनुभवलेल्या सुट्टीचे वेगळपण

३. स्वमत कृती-  (३)

उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट तुम्ही पाहता का? कसे ते स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

१.

  1. थंडी कमी होण्याची वेळ- होळीनंतरचा काळ
  2. लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना- मार्च - एप्रिल

२. लेखिकेने अनुभवलेल्या सुट्टीचे वेगळपण-

  • अंगणातील हजारी मोगऱ्याचे झाड
  • शनिवारवाड्यातून वेचून आणलेली बकुळीची फुले
  • माठातलं वाळा घातलेलं पाणी
  • आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई
  • अंगणभर पडणारी वाळवणं
  • कैरीची डाळ आणि पन्हं
  • बर्फाचे गोळे
  • उसाचा रस
  • गोष्टीची व कवितांची नवी पुस्तकं

३. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आमच्यासाठी मोठी पर्वणीच असते. आम्ही सारी भावंडे आजोळी एकत्र येतो आणि ती सुट्टी भरभरून जगतो. उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहणे हे साधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होते. परीक्षेचे वेळापत्रक मिळाल्यापासूनच आईबाबांना गावी कधी जाणार याची विचारणा सुरू होते. उन्हाळ्याची सुट्टी किती दिवस असणार आणि त्या दिवसात आपण काय काय करणार याच्या योजना मनातल्या मनात सुरू होतात. गेल्यावर्षी केलेली धमाल, गावची जत्रा, शेतात, नदीकिनारी मित्रांबरोबर जाणे याच्या आठवणी परत परत येत राहतात. यावर्षी नवीन काय करायचे? कोण येणार आहे? कोण भेटू शकणार नाही? याची चर्चा घरात सुरू होते. कसे जायचे याची तयारी आणि सोबतच परीक्षेची तयारी याची सांगड घालत मी उन्हाळ्याच्या सुट्टीची दरवर्षी वाट पाहतो.

shaalaa.com
वाट पाहताना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: वाट पाहताना - कृती क्रमांक १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 8 वाट पाहताना
कृती क्रमांक १ | Q 1. (अ)

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ______ 


कारणे शोधा.

पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ______ 


कारणे शोधा.

पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ______ 


तुलना करा. 

व्यक्तीशी मैत्री  कवितेशी मैत्री
______ ______
______ ______
______ ______
______ ______

‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्‌द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा. 

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे
     
     
     

पाठाच्या (वाट पाहताना) शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.


म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.


‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. उत्तरे लिहा:  (2)

  1. म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार - ______
  2. आपल्या तरुण मुलाला ‘माणसं’ दाखवणारा - ______
            शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो.

2. आकृती पूर्ण करा.  (2)

3. स्वमतः  (3)

‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्‌गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×