हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

एकदा हिवाळ्यात आम्ही काही मित्रमैत्रिणी पाचगणीला गेलो होतो. जिथे मी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी तीन दिवस घालवले तिथे आम्हांला एकही वेळा स्वच्छ आकाश पाहायला मिळाले नाही. संपूर्ण परिसर धुक्याने घेरलेला होता. झाडांवर धुक्याच्या चादरी सारखे पांघरूण दिसत होते, आणि तोंडाने फुंकर मारल्यावर धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावर चालत असताना एक विलक्षण अनुभव आला. अवतीभवती शिरिषाची विस्तारलेल्या फांद्यांची खूप झाडे होती. अचानक एक क्षणासाठी ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली नि झाडाच्या तळाशी सूर्यप्रकाशाच्या गोल-गोल चकत्या उमटल्या. या क्षणी मला अशोक बागवे यांच्या कवितेची ओळ 'सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे। मखमलीची झीळ त्याला हिर्वळे दर्वळे' आठवली. धुक्याच्या दिवसांतील हा विशेष क्षण माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला.

shaalaa.com
इंग्लंडचा हिवाळा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10.2: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन) - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10.2 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q ४. (इ) | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×