Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे.
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
या विधानाशी मी सहमत नाही.
कारणे:
- एकजिनसी वस्तू: पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इ. बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात.
- मुक्त प्रवेश आणि निर्गमन: या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योगसंस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात.
- एकच किंमत: पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
