हिंदी

पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.

भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

या विधानाशी मी सहमत आहे.

कारणे:

  1. कर्जदाराची अल्पमुदतीची गरज: नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते.
  2. तरलता व्यवस्थापन: नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी, देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि आर्थिक विकास होतो.
  3.  गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन (पोर्टफोलिओ): नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनविलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडित असतो. याद्वारे गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळविण्यास मदत होते.
  4. समतोल यंत्रणा: नाणे बाजार साधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करतो.
  5. सरकारच्या वित्तीय गरजा: नाणे बाजार शासनाला कोषागार(ट्रेझरी) देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो.
  6. मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी: मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे. जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या निरिक्षालयाच्या क्षेत्रांची आवश्यकता (गरज) पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. हे धोरण मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केले जाते.
    अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिकविषयक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची मदत देते. नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते.
  7. रोख रकमेचा काटकसरिने वापर: नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाच्या निकटच्या (जवळच्या) पर्यायी असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीनें वापर होतो.
  8. वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी: नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना हुल्ली/हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×