हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

कारण बताइए
Advertisements

उत्तर १

  1. इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात.
  2. प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते.
  3. या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
shaalaa.com

उत्तर २

  1. इतिहासाच्या साधनांसंबंधित विविध कृती केल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
    1. इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करणे व त्यांची सूची तयार करणे.
    2. जुने ग्रंथ, हस्तलिखिते, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधने यांची साफसफाई करणे आणि ही ऐतिहासिक साधने प्रदर्शित करणे.
  2. वरील सर्व कृती इतिहासाच्या साधनांच्या जतन व संवर्धनासाठी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. म्हणूनच, योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येत असल्याने विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
shaalaa.com
इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३ २.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×