हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर १

  1. ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात; तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारांत केले जाते.
  2. ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयांकडून केली जातात.
  3. इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी; म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात.
shaalaa.com

उत्तर २

१. इतिहासकारांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला इतिहासाची साधने व त्या साधनांवर आधारित लिहिलेले ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत.

२. मौल्यवान अशा या ठेव्यांचे जतन व संवर्धन आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू यांचे प्रदर्शन करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडित असलेली अभिलेखागारे व ग्रंथालये करत असतात.

३. ज्या दस्तऐवज व पुरावस्तूंचे प्रदर्शन केले जात नाही; परंतु ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे महत्त्व असते अशा गोष्टी अभिलेखागारांमध्ये जतन केल्या जातात आणि संशोधकांना हे दस्तऐवज व पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात.

४. ग्रंथालयांमध्येदेखील ग्रंथांचे जतन व व्यवस्थापन केले जाते.

वरील सर्व कामांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

shaalaa.com
ग्रंथालये आणि अभिलेखागार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३ १.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×