Advertisements
Advertisements
प्रश्न
लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- लसीकरण म्हणजे लस देणे. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळावी म्हणून ही लस देण्यात येते.
- पूर्वीच्या काळी रोगजंतूंचा वापर करूनच लस तयार केली जात असे. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई. परंतु यातून काही जणांना त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असे.
- हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन (Antigen) म्हणून काम करते, त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले.
- अशा प्रतिजनाचा वापर लस म्हणून केला, तर सुरक्षितरीत्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजे लसीकरण करणे होय.
- प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि ताप स्थिर लसी देऊन, लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हेपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
जोड्या जुळवा.
| अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
| आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
| इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणू संक्रमण |
| ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
| 5. हिमोफिलीया |
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
जोड्या लावा.
| सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
| 1) मोहरी | अ) किरणोत्सार |
| 2) डिईनोकोकस रेडिओडरन्स | ब) सेलेनियम |
| क) अर्सेनिक | |
| ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
शास्त्रीय कारणे लिहा.
तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.
