हिंदी

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया.

१. चौकटी पूर्ण करा.

(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- 
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-

२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

१. (अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक- प्रकाश, सत्य व साधेपणा

(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- त्याग व नम्रता

(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक- हरितश्यामल भूमाता

२. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलात फडकू लागला. तिरंग्यात केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत. त्यांपैकी 'केशरी' रंग हा त्यागाचे व नम्रतेचे प्रतीक आहे. या देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या त्यागाचे ते स्मरण आहे. भारत ही साधूसंतांची भूमी आहे, म्हणूनही या केशरी रंगाचे महत्त्व आहे. त्यानंतर येणारा पांढरा रंग हा प्रकाश, सत्य व साधेपणाचे प्रतीक आहे. या रंगामुळे शांतता व पावित्र्याचे दर्शन घडते. या पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक अशोकचक्र आहे. ते गतिमानता, सद्गुण व धर्माची खूण आहे. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय, सत्यमय राहून काम करायला हवे, असा संदेश ते देते.

तर हिरवा रंग हा हिरव्यागार, सस्यश्यामल भूमातेचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्याची समृद्धी, भरभराट दर्शवतो. अशाप्रकारे, या 'तिरंगा' ध्वजाखाली उभे राहून आपण सर्वांनी सेवावृत्तीने, कोणताही अहंकार मनी न बाळगता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करूया, असा संदेश 'तिरंगा' सदैव देत असतो.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12.1: पुन्हा एकदा - अपठित गद्य आकलन [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 12.1 पुन्हा एकदा
अपठित गद्य आकलन | Q १. | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्न

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


चौकटी पूर्ण करा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

स्वतःची कामे स्वतः करणारा - 


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.


‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×