Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मध्ये फरक स्पष्ट करा.
पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| मुद्दे | पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा | उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा |
| १. सामाजिक स्थान | पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान हे उत्तर वैदिक काळाच्या तुलनेत उच्च दर्जाचे होते. | उत्तर वैदिक काळात स्त्रियांच्या सामाजिक स्थानाची घसरण होऊन, ते दुय्यम झाले. |
| २. पुरुषांच्या तुलनेत | पूर्व वैदिक काळात स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नसला तरी प्रतिष्ठित होता. | उत्तर वैदिक काळात स्त्रियांचे स्थान हे पुरुषांच्या तुलनेत दुय्यम झाले होते. |
| ३. उपनयन संस्कार | स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार आणि वैदिक शिक्षण घेण्याची मुभा होती. वेदविद्या प्राप्त केलेल्या लोपामुद्रा आणि गार्गीसारख्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. | स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार आणि शिक्षण संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. राजघराण्यातील व उच्चवणींय स्त्रियांना खासगीरीत्या शिक्षण प्राप्त करण्याची मुभा होती. मात्र बहुसंख्य स्त्रियांचे सामाजिक स्थान गौण होते. |
|
४. स्त्रियांची भूमिका |
स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जायची. त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती. विधवा विवाहाला समाजाची स्वीकृती होती. एकपत्नीत्वाला प्राधान्य होते. कुटुंबाच्या स्थावर संपत्तीवर त्यांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. | स्त्रियांची भूमिका घरगुती कर्तव्यांशी बांधली गेली. मुलीचा जन्म अवांच्छित मानला जाऊ लागला. त्यांच्याविषयीचे सर्व निर्णय कुटुंबातील पुरुष घेत असत. स्त्रियांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत कुटुंबातील पुरुषांच्या आज्ञेत राहावे, असा दंडक घातला गेला. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
