Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर टिपा लिहा.
सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- सामूहिक स्वरूप: सामाजिक चळवळ ही एक सामूहिक कृती असून, त्यात संपूर्ण समूह सहभागी होणे अपेक्षित असते.
- नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती: सामाजिक चळवळी प्रभावी होण्यासाठी त्या पूर्वनियोजित असणे आवश्यक आहे. चळवळ ही उत्स्फूर्त नसून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याची ती हेतुपुरस्सर कृती असते.
- विचारप्रणाली आणि उद्दिष्टे: सामाजिक चळवळी विशिष्ट विचारप्रणालीवर आधारित असतात. चळवळीचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी विचारप्रणाली त्यास मार्गदर्शन करते.
- सामाजिक बदल: सामाजिक चळवळींचा उद्देश बदल घडवून आणणे हा असतो. चळवळ सामान्यतः प्रस्थापित व्यवस्थेत बदल करण्यासाठी हाती घेतली जाते. शासनाच्या अन्यायकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी चळवळी उभारल्या जातात. सत्ताधिकाऱ्याने सुरू केलेल्या बदलास चळवळ प्रतिरोध करते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
