हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले, की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व ७ किलोग्राम साखर ऑनलाइन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला, तर चहा आणि साखर यांचा प्रतिकिलोग्राम दर काढा.

योग
Advertisements

उत्तर

समजा, चहाचा प्रतिकिलोग्राम दर ₹ x व साखरेचा प्रतिकिलोग्राम दर ₹ y आहे.

दिलेल्या पहिल्या अटीनुसार,

दीड किलो चहाची किंमत + पाच किलो साखरेची किंमत + रिक्षाभाडे = एकूण खर्च

∴ `1 1/2`x + 5y + 50 = 700

∴ `3/2`x + 5y = 700 - 50

∴ `3/2`x + 5y = 650

∴ 3x + 10y = 1300    ....(i) [दोन्ही बाजूंना 2 ने गुणून]

दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार,

2 किलो चहाची किंमत + 7 किलो साखरेची किंमत = 880

2x + 7y = 880    ....(ii)

समीकरण (i) ला 2 ने गुणून,

6x + 20y = 2600    ....(iii)

समीकरण (ii) ला 3 ने गुणून,

6x + 21y = 2640      .....(iv)

समीकरण (iv) मधून समीकरण (iii) वजा करून,

6x + 21y = 2640
6x + 20y = 2600
-   -            -     
  y  =  40

y = 40 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

3x + 10y = 1300

3x + 10(40) = 1300

∴ 3x + 400 = 1300 

∴ 3x = 1300 - 400

∴ 3x = 900

∴ x = `900/3` = 300

∴ चहाचा प्रतिकिलोग्राम दर ₹ 300 व साखरेचा प्रतिकिलोग्राम दर ₹ 40 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 7. (2) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.


एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा.


समीकरणे सोडवून उत्तर लिहा.

100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`


एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यांतील अंतर ३० किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे २० मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?


एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचे गुणोत्तर 5 : 3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे, तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.


एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.


एका अंकगणिती श्रेढीसाठी t17 = 54 आणि t9 = 30 असल्यास प्रथम पद (a) आणि सामान्य फरक (d) काढा. 


एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?


एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी ने जास्त आहे, तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती?


कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×