हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात.

  1. काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हा अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरीत्या जपले जातात. हे सारे अवशेष, तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात.
  2. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते.
  3. याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो.
  4. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठरावीक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत.
  5. त्या त्या कालावधीत, अनुक्रमे अपृष्ठवंशीय; मत्स्य, उभयचर, सरीसृप; नंतर मध्यजीव महाकल्प सरिसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात.
  6. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 7. उ. | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.


प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

भ्रूणविज्ञान


अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.


उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?


उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.


प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.


__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.


मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.


शास्त्रीय कारणे लिहा.

अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.


शास्त्रीय कारणे लिहा.

डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×