हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर १

भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-

  1. राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.
  2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.
  3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.
  4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
  5. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
  6. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते.
    इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
shaalaa.com

उत्तर २

प्रस्तावना: वि. का. राजवाडे यांनी इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयांवर मूलभूत संशोधन करून, मराठी भाषेतून इतिहासलेखन केले.

१. राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. तसेच, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या विचाराचा पुरस्कार केला. 

२. राजवाडे यांनी मांडलेले महत्त्वपूर्ण विचार:

अ. ’इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत“.

ब. ’मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला असून काल, स्थल आणि व्यक्ती यांची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय.“

३. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा राजवाडे यांचा आग्रह होता. इतिहाससंशोधनाच्या कार्याकरता त्यांनी ७ जुलै १९१० रोजी पुणे येथे 'भारत इतिहास संशोधक मंडळ' स्थापन केले.

निष्कर्ष: अशारीतीने, राष्ट्रवादी इतिहासलेखनाद्वारे वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या अभ्यासाला तात्त्विक बैठक मिळवून दिली. 

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
लांब उत्तरे २ | Q ५. २.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×