हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3 : 5 होते, तर तो अपूर्णांक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3 : 5 होते, तर तो अपूर्णांक काढा.

योग
Advertisements

उत्तर

अपूर्णांकाचा अंश x व छेद y मानू.

आवश्यक अपूर्णांक = `x/y`

y = 2x − 1

∴ 2x − y = 1   ...(1)

`(x + 1)/(y + 1) = 3/5`

∴ 5x + 5 = 3y + 3

 ∴ 5x - 3y = 3 - 5

 ∴ 5x - 3y = - 2 ...(2)

समीकरण (1) च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणून,

6x − 3y = 3   ...(3)

समीकरण (3) मधून समीकरण (2) वजा करू,

6x − 3y = 3

5x − 3y = −2

−    +       +   
x           = 5

x = 5 ही किंमत समीकरण (1) मध्ये ठेवू,

2x − y = 1

∴ 2(5) − y = 1

∴ y = 10 − 1

∴ = 9

∴ आवश्यक अपूर्णांक = `x/y = 5/9` आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - सरावसंच 5.2 [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 दोन चलांतील रेषीय समीकरण
सरावसंच 5.2 | Q (2) | पृष्ठ ९०

संबंधित प्रश्न

एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत.नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत?


एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा.


ΔABC मध्ये कोन A चे माप हे ∠B व ∠C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠B व ∠C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.


एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहेत, की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या `1/3` पट आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा.


8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा.


दोन व्यक्तींच्या उत्पन्नांचे गुणोत्तर 9 : 7 आहे व त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा.


एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


एका रस्त्यावरील A व B या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किमी आहे. एक कार A ठिकाणाहून व दुसरी कार B या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात व विरुद्ध दिशेने निघाल्यास 1 तासात भेटतात, तर त्यांचे वेग काढा.


एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×