हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत.नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा कमी आहे - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत.नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत?

योग
Advertisements

उत्तर

5 रुपयांच्या नोटांची संख्या x आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या y असे मानू.

5x + 10y = 350 ...(I) 

5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या दुप्पट संख्येपेक्षा 10 ने कमी आहे.

x = 2y − 10

∴ x − 2y = −10   ...(II)

समीकरण (ii) च्या दोन्ही बाजूंना 5 ने गुणून

∴ 5x − 10y = −50   ...(III)

समीकरण (i) व समीकरण (III) यांची बेरीज करू

5x + 10y = 350

5x − 10y = −50
____________

10x         = 300

∴ x = `300/10`

∴ x = 30

x = 30 ही किंमत समीकरण (II) मध्ये ठेवू,

30 − 2y = −10

30 – 2y = –10

∴ 30 + 10 = 2y

∴ 40 = 2y

∴ y = `40/2`

∴ y = 20

∴ पाकिटात 5 रुपयांच्या 30 नोटा व 10 रुपयांच्या 20 नोटा आहेत.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - सरावसंच 5.2 [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 दोन चलांतील रेषीय समीकरण
सरावसंच 5.2 | Q (1) | पृष्ठ ९०

संबंधित प्रश्न

एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3 : 5 होते, तर तो अपूर्णांक काढा.


प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा


एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा.


ΔABC मध्ये कोन A चे माप हे ∠B व ∠C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠B व ∠C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.


एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहेत, की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या `1/3` पट आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा.


एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ॠण एक गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती?


8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा.


एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


एका रस्त्यावरील A व B या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किमी आहे. एक कार A ठिकाणाहून व दुसरी कार B या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात व विरुद्ध दिशेने निघाल्यास 1 तासात भेटतात, तर त्यांचे वेग काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×