हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा.

योग
Advertisements

उत्तर

संजयचा सुरुवातीचा पगार x मानू.

वार्षिक वाढीची रक्कम y मानू,

4 वर्षानंतर त्यांचा मासिक पगार रु. 4500.

मासिक पगार + 4 वर्षांची वार्षिक पगार  वाढ = 4500

x + 4y = 4500   ...(i)

10 वर्षांनंतर त्यांचा मासिक पगार 5400 रुपये झाला.

मासिक पगार + 10 वर्षांनंतर वार्षिक पगार  वाढ = 5400

x + 10y = 5400   ...(ii)

समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करू.

x + 4y = 4500

x + 10y = 5400

−   −      −         
    −6y    = −900

∴ y = 150

y = 150 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवू,

x + 4y = 4500

x + 4 × 150 = 4500

x + 600 = 4500

x = 4500 - 600

x = 3900

∴ संजयचा सुरुवातीचा पगार ₹ 3900 व वार्षिक वाढीची रक्कम ₹ 150 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन चलांतील रेषीय समीकरण - सरावसंच 5.2 [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 दोन चलांतील रेषीय समीकरण
सरावसंच 5.2 | Q (5) | पृष्ठ ९०

संबंधित प्रश्न

एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3 : 5 होते, तर तो अपूर्णांक काढा.


प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा


एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा.


ΔABC मध्ये कोन A चे माप हे ∠B व ∠C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠B व ∠C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.


एक दोन अंकी संख्या, त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने मोठी आहे. जर त्या संख्येमध्ये 18 मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते, तर ती संख्या काढा.


8 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 420 रुपये आहे आणि 5 पुस्तके व 8 पेन यांची एकूण किंमत 321 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा.


एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


एका रस्त्यावरील A व B या दोन ठिकाणांमधील अंतर 70 किमी आहे. एक कार A ठिकाणाहून व दुसरी कार B या ठिकाणाहून निघते. जर त्या एकाच दिशेने निघाल्या तर एकमेकींना 7 तासात भेटतात व विरुद्ध दिशेने निघाल्यास 1 तासात भेटतात, तर त्यांचे वेग काढा.


एक दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे, तर ती संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×