Advertisements
Advertisements
प्रश्न
बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g)
Advertisements
उत्तर
दिलेले :
m1 = 2 kg, ΔT1 = 20°C - 0°C
= 20°C, c1 = 1 kcal/kg. °C, L1 (बर्फ)
= 80 kcal/kg, L2
(द्रवरूप अमोनिआचे बाष्पन) = 341 cal/g = 341 kcal/kg, m2 = ?
Q1 (पाण्याने गमावलेली उष्णता) = m1c1ΔT1 + m1L1
= 2kg × 1 kcal/kg. °C × 20°C + 2kg × 80 kcal/kg
= 40 kcal + 160 kcal = 200 kcal
Q2 (अमोनियाने शोषलेली उष्णता) = m2L2
= m2 × 341 kcal/kg
उष्णता विनिमयाच्या तत्त्वानुसार,
Q1 = Q2
∴ 200 kcal = m2 × 341 kcal/kg
∴ m2 = `200/341` kg = 0.5864 kg = 586.4 g
586.4 g अमोनिआचे बाष्पन करावे लागेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.
जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.
बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.
बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______
धुके कसे तयार होते?
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | कोरडी हवा | अ) | 4°C |
| 2) | दमट हवा | ब) | सापेक्ष आर्द्रता 100% |
| 3) | संपृक्त हवा/दवबिंदू तापमान | क) | सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी |
| 4) | पाण्याची महत्तम घनता | ड) | सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त |
| इ) | - 4°C |
नावे लिहा.
साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.
नावे लिहा.
पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.
बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- दिलेला आलेख काय दर्शवतो?
- रेषा AB काय दर्शवते?
- रेषा BC काय दर्शवते?
