Advertisements
Advertisements
प्रश्न
पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
(१) स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीस त्याचे तापमान वाढते. या वेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची (अणू, रेणू इत्यादी) गतिज ऊर्जा वाढवण्यात, तसेच त्या कणांमधील आकर्षण बल विरुद्ध कार्य करण्यात, म्हणजेच अणू/रेणूंमधील बंध कमकुवत करण्यासाठी वापरली जाते. उष्णता देणे सुरू ठेवल्यास ठरावीक तापमानाला (द्रवणांक) स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते. या वेळी तापमान स्थिर राहते व पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणांमधील बंध तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.
(२) द्रवाचे द्रवाच्या उत्कलनांकावर वायूमध्ये रूपांतर होतानाही उष्णता शोषली जाते, पण तापमान बदलत नाही. या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. या वेळी शोषलेल्या उष्णतेचा वापर द्रवाच्या कणांमधील बंध कमकुवत करण्यासाठी व अवस्थांतरासाठी होतो.
(३) काही पदार्थांच्या बाबतीत ठरावीक भौतिक स्थिती असताना स्थायूचे बाष्पात रूपांतर होऊ शकते. या वेळीही उष्णता शोषली जाते, पण तापमान स्थिर राहते. या उष्णतेस संप्लवनाचा अप्रकट उष्मा म्हणतात.
(४) अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाचे स्थिर तापमानास अवस्थांतर होत असताना पदार्थाने शोषून घेतलेली अथवा बाहेर टाकलेली उष्णता होय. द्रवाचे स्थायूत रूपांतर होताना, बाष्पाचे द्रवात रूपांतर होताना, तसेच बाष्पाचे स्थायूत रूपांतर होताना हा अप्रकट उष्मा पदार्थाकडून बाहेर टाकला जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.
बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.
बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?
धुके कसे तयार होते?
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| राशी | एकके | ||
| 1) | निरपेक्ष आर्द्रता | अ) | J किंवा cal |
| 2) | अप्रकट उष्मा | ब) | J/kg°C |
| 3) | विशिष्ट उष्माधारकता | क) | kJ/kg |
| 4) | उष्णता | ड) | एकक नाही |
| इ) | kg/m3 |
नावे लिहा.
साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.
नावे लिहा.
पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.
40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.
