हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे:

  1. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
  2. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
  3. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
    याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
  4. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
shaalaa.com
भारतामधील हवामान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: हवामान - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 हवामान
स्वाध्याय | Q ४. (ई) | पृष्ठ ३१
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 हवामान
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 4

संबंधित प्रश्न

चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.


भौगोलिक कारणे लिहा:

भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.


दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.


भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते.


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
  2. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
  3. चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
  5. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
  6. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.

तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.

  1. सिक्कीम
  2. लक्षद्वीप बेटे

  3. चेन्नई बंदर
  4. आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई
  5. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
  6. कर्कवृत्त

वेगळा घटक ओळखा:

भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश 


थोडक्यात टिपा लिहा.

परतीचा मान्सून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×