हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.

दीर्घउत्तर
विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर १

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत:

  1. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते.
  2. उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५° से ते ३०° से असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५° से ते १०° से असते.
  3. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते.
  4. उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते.
shaalaa.com

उत्तर २

  1. भारताचे हवामान ‘मान्सून‘ प्रकारचे आहे तरीदेखील भारतातील हवामानामध्ये विविधता दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे अक्षवृत्तीय स्थान व त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची हे होय.
  2. भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे, या भागाचे तापमान उष्ण दिसून येते.
  3. भारतातील उत्तरेकडील भाग हा समशीतोष्ण, तर दक्षिणेकडील भाग हा उष्ण कटिबंधीय हवामानाचा आहे. भारताच्या दक्षिण भागात उत्तर भागापेक्षा तापमान जास्त असते.
  4. तसेच, दक्षिण भारतातील पर्जन्यामध्येही आपणांस बदल दिसून येतो. केरळ राज्यास नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस मिळतो, तर तमिळनाडू राज्यास ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस मिळतो.
  5. पश्चिम किनाऱ्यालगत असणाऱ्या पश्चिम घाटाकडून नैऋत्य मान्सून वारे अडवले जाऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे, पश्चिम किनाऱ्यावर पावसाचे प्रमाण अधिक दिसून येते, तर वातविन्मुख प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी दिसून येते.
  6. तसेच, अरवली पर्वतरांगा या बाष्पयुक्त वाऱ्यांना समांतर असल्याने गुजरात व राजस्थानमध्ये अवर्षणाची स्थिती दिसून येते.
  7. उत्तर व पूर्व हिमालय पर्वतरांगांच्या प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून अधिक असल्याने या प्रदेशाचे तापमान अतिशय कमी दिसून येते. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरचे तापमान -४०° से पर्यंत कमी होते. उत्तरेकडील या प्रदेशात बर्फवृष्टीदेखील होताना दिसते. तसेच, हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
    अशारीतीने, भारतामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे हवामानात बदल होताना दिसतात
shaalaa.com
भारतामधील हवामान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: हवामान - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 हवामान
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ३१
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 हवामान
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 2

संबंधित प्रश्न

चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.


भौगोलिक कारणे लिहा:

भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.


भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.


भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते.


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
  2. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
  3. चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
  5. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
  6. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.

तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.

  1. सिक्कीम
  2. लक्षद्वीप बेटे

  3. चेन्नई बंदर
  4. आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई
  5. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
  6. कर्कवृत्त

वेगळा घटक ओळखा:

भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश 


थोडक्यात टिपा लिहा.

परतीचा मान्सून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×