Advertisements
Advertisements
प्रश्न
A(-14, -10), B(6, -2) असलेल्या रेख AB चे चार एकरूप रेषाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
Advertisements
उत्तर
समजा, बिंदू C, D आणि E हे रेख AB चे चार एकरूप रेषाखंडांत विभाजन करतात.
बिंदू D हा रेख AB चा मध्यबिंदू आहे.
समजा, A(–14, –10) = (x1, y1), B(6, –2) = (x2, y2)
∴ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,
D चे x निर्देशक = `(x_1 + x_2)/2 = (-14 + 6)/2 = (-8)/2 = -4`
D चे y निर्देशक = `(y_1 + y_2)/2 = (-10 - 2)/2 = (-12)/2 = -6`
D चे निर्देशक (-4, -6) चे आहेत.
बिंदू C हा रेख AD चा मध्यबिंदू आहे.
समजा, A(–14, –10) = (x1, y1), D(-4, –6) = (x2, y2)
∴ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,
C चा x निर्देशक = `(x_1 + x_2)/2 = (-14 - 4)/2 = (-18)/2 = -9`
C चा y निर्देशक = `(y_1 + y_2)/2 = (-10 - 6)/2 = (-16)/2 = -8`
∴ C चे निर्देशक (–9, –8) आहेत.
बिंदू E हा रेख DB चा मध्यबिंदू आहे.
समजा, D(–4, –6) = (x1, y1), B(6, –2) = (x2, y2)
∴ मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,
E चा x निर्देशक =`(x_1 + x_2)/2 = (-4 + 6)/2 = 2/2 = 1`
E चा y निर्देशक =`(y_1 + y_2)/2 = (-6 - 2)/2 = (- 8)/2 = -4`
E चे निर्देशक (1, -4) आहेत.
∴ रेख AB चे चार एकरूप रेषाखंडांत विभाजन करणार्या बिंदूंचे निर्देशक (– 9, – 8), (– 4, – 6) व (1, – 4) आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर P बिंदू हा A(−1, 7) आणि B(4, −3) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 : 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा.
P-T-Q असून, बिंदू T(-1, 6) हा बिंदू P(-3, 10) आणि बिंदू Q(6, -8) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो?
बिंदू A(8, 9) आणि B(1, 2) यांना जोडणाऱ्या रेख AB चे P(k, 7) हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि k ची किंमत काढा.
A(20, 10), B(0, 20) असलेल्या रेख AB चे पाच एकरूप रेषाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
खालील दिलेल्या उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा.
P(-3, 7), Q(1, -4), a : b = 2 : 1
A(3,8) आणि B(-9,3) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y - अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो?
जर A(4,-3) आणि B(8,5), तर रेख AB चे 3ः1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा.
जर बिंदू P(1, 1) हा बिंदू A आणि B(–1, –1) यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5:2 या गुणोत्तरात छेदत असेल,तर A या बिंदूचे निर्देशक काढा.
जर A(–5, 3) आणि B(3, –5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला बिंदू P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल, तर P चे निर्देशक ______
A(8, 9) आणि B(1, 2) यांना जोडणाऱ्या रेख AB ला बिंदू P(6, 7) ज्या गुणोत्तरात विभागतो ते गुणोत्तर शोधा.
कृती: बिंदू P हा रेख AB ला m : n या गुणोत्तरात विभागतो.
A(8, 9) = (x1, y1), B(1, 2) = (x2, y2) P(6, 7) = (x, y)
विभाजन सूत्रानुसार,
∴ 7 = `(m(square) - n(9))/(m + n)`
∴ 7m + 7n = `square` + 9n
∴ 7m - `square` = 9n - `square`
∴ `square` = 2n
∴ `m/n = square`
