SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 24th February 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना :-
- सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातोल प्रश्नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळला व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, 'संतसाहित्यचिंतना'सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला ! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे 'हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. |
- आकृती पूर्ण करा: [2]

- एका शब्दांत उत्तर लिहा: [1]
लेखकाचा संतसाहित्यावरील ग्रंथ - - स्वमत: [3]
'मकबरा आणि लेखक' यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: 2

(2) आकृती पूर्ण करा: 2

| वन्य पशुपक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, तिच्या रक्षणाकडे आम जनतेचे लक्ष वेधावे. यासाठी सरकारने प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागवले. वृत्तपत्रांतून अभिप्राय मागवण्यात आले आणि अशा रीतीने अनेक पक्ष्यांची नावे राजेपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आली. त्यात गरुड, हंस, महासारंग आदी पक्ष्यांचीही नावे होती. अनेक पक्ष्यांच्या नावांतून एक नाव निवडण्यासाठी अनेक कसोट्या लावण्यात आल्या. त्या सर्व कसोट्यांत मोर उत्तीर्ण झाला आणि 'राष्ट्रीय पक्षी' म्हणून त्याची निवड करण्यात आली. या कसोट्या लावताना ऐतिहासिक प्रणाली, काव्याची पार्श्वभूमी, लोकांची आवड इत्यादी बाह्य कारणांबरोबरच रंग, शरीरसौष्ठव, कलात्मकता, कंठस्वर आदी पक्षी वैशिष्ट्यांचाही विचार करण्यात आला आणि त्यात 'राष्ट्रीय पक्षी' हा मानाचा किताब देण्यास 'मोर' हाच पक्षी योग्य आहे, असे ठरवण्यात आले. |
(3) उत्तर लिहा: 2
- आपली राष्ट्रीय संपत्ती -
- आपला राष्ट्रीय पक्षी -
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा:

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे अशी अचल फुलपाखरे फुले साळिस जणु फुलती झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा. |
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- सोनेरी मुकुट घालणारी - ______
- साळीवर झोपणारी - ______
(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तन्हेत-हेचे इंद्रधनुष्याचे!
Chapter:
सूचनेनुसार कृती सोडवा:
मी तो कागद घेऊन बाहेर पडले. (भविष्यकाळ करा)
Chapter:
सूचनेनुसार कृती सोडवा:
मी तुझ्या पाठीशी आहे. (काळ ओळखा)
Chapter:
Advertisements
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:
| वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ |
| (i) गायब होणे. | (1) एकसारखे बघणे. |
| (ii) टक लावून बघणे. | (2) नाहीसे होणे. |
| (3) टक टक करणे. |
Chapter:
पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
वजनदार
Chapter:
अचूक शब्द ओळखून लिहा.
गारहाणी
गाऱ्हाणि
गाऱ्हाणी
ग्राहणी
Chapter: [16] व्याकरण विभाग
पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:
| विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
| ! | ............. |
Chapter:
पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:
| विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
| ? | ............. |
Chapter:
Advertisements
खालील निवेदन वाचून पत्रलेखन करा:
| अ, आ, इ, ई ... मराठी सुलेखन वर्ग समीक्षा अकॅडमी तर्फे मराठी सुलेखन वर्गाचे आयोजन |
|
| कालावधी 1 मे ते 15 मे |
वेळ - सकाळी 9 ते 10 |
|
वैशिष्ट्ये
|
|
| संपर्क - व्ही. एम. गायकवाड (आयोजक) 920, रविवार पेठ, सातारा E-mail - [email protected] |
|
मधुरा/मधुकर जगताप विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील विद्यार्थ्यांना सुलेखन वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.
Chapter:
खालील निवेदन वाचून पत्रलेखन करा:
| अ, आ, इ, ई ... मराठी सुलेखन वर्ग समीक्षा अकॅडमी तर्फे मराठी सुलेखन वर्गाचे आयोजन |
|
| कालावधी 1 मे ते 15 मे |
वेळ - सकाळी १ ते 10 |
|
वैशिष्ट्ये
|
|
| संपर्क - व्ही. एम. गायकवाड (आयोजक) 920, रविवार पेठ, सातारा E-mail - [email protected] |
|
मधुरा/मधुकर जगताप विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने सुलेखन वर्गाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Chapter:
खालील उतारा वाचून एका वाक्यात उत्तरे येतील असे चार प्रश्न तयार करा:
| आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत रहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो, म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते, त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. |
Chapter:
पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती सोडवा:
|
जागृती कन्या विद्यालयाच्या इमारत निधीसाठी खास नाट्यप्रयोग अजब न्याय दिग्दर्शक/कलाकार/-सादरकर्ते- जागृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी तिकीट खरेदी करा आणि सामाजिक कार्याला हातभार लावा तिकीट दर: 100 रु. दिनांक: 25 एप्रिल वेळ: दुपारी 1 वाजता. - स्थळ - जागृती सभागृह, चंद्रपूर - तिकीट विक्री - शाळेच्या मुख्य कार्यालयात रोज 10:00 ते. 05:00 वाजेपर्यंत. |
चौकटी पूर्ण करा:
- नाटकाचे स्थळ -
- तिकीट दर -
- नाटकातील कलाकार -
- नाटकाची वेळ -
Chapter:
खालील विषयावर बातमी तयार करा:
'आदर्श विद्यालय', रत्नागिरी येथे मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 'वनमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ संपन्न.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा:
एक मुलगा - आईबरोबर झोपडीत राहणे - पावसाळ्याचे दिवस - भयंकर वारा व पाऊस - रेल्वे रूळ उखडणे - त्याच्या नजरेत येणे - अंगातला लाल शर्ट काढून आगगाडी थांबवणे - प्रवाशांचा संताप - ड्रायव्हरची रूळांवर नजर पडणे - रूळ उखडलेले दिसणे - मुलामुळे प्रवाशांचे प्राण वाचणे - रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मुलाचा सन्मान.
Chapter:
दिलेल्या मुद्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.
How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.

