Advertisements
Advertisements
Question
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कारणे लिहा: (2)
- पंतांची पहिली उडीच शेवटची ठरली, कारण ................
- आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाहीत, कारण ................
|
दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते. “हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.” “पण........मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.” “काही उपयोग होणार नाही!” “का?” “का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा. मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील.” |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
दोरीवरील उड्यांचे झालेले परिणाम

(3) स्वमत: (3)
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
Advertisements
Solution
(1)
- पतांची पहिली उडी शेवटी ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या त्यांच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड होते आणि पहिल्याच उडीत दोरीने ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली पाडल्या.
- आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही समारंभाला आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.
(2) दोरीबरील उड्यांचे झालेले परिणाम

(3) ‘उपास’ या पाठातील दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रसंग अतिशय विनोदी आहे. वजन कमी करण्यासाठी लेखक जेव्हा दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या घराच्या मर्यादित जागेमुळे (८x१० चा दिवाणखाना) फजिती होते. पहिल्याच उडीत घरातील वस्तूंचे नुकसान होते, तर दुसऱ्या प्रयत्नात दोरी थेट शेजारी राहणाऱ्या कडक शिस्तीच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात अडकते. ज्यांच्याशी लेखकाचे आधीच पटत नव्हते, त्यांच्याच गळ्यात दोरी अडकणे आणि त्यावर बर्व्यांनी दिलेली प्रतिक्रिया हा भाग वाचताना खूप हसू येते. स्वतःचे वजन कमी करण्याच्या उत्साहात लेखकांची झालेली ही धांदल आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती लेखकाने अतिशय मिश्किलपणे मांडली आहे. त्यामुळे हा प्रसंग अत्यंत विनोदी वाटतो.
