Advertisements
Advertisements
Question
उमेशकडे 15 Ω व 30 Ω रोध असणारे दोन बल्ब आहेत. त्याला ते बल्ब विद्युत परिपथामध्ये जोडायचे आहेत. परंतु त्याने ते बल्ब एक, एक असे स्वतंत्र जोडले तर ते बल्ब जातात. तर
अ. त्याला बल्ब जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडावे लागतील?
आ. वरील प्रश्नाच्या उत्तरानुसार बल्ब जोडण्याच्या पद्धतीचे गुणधर्म सांगा.
इ. वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध किती असेल?
Advertisements
Solution
अ. त्याने ते बल्ब समांतर जोडणीत जोडावे.
आ. प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते.
- रोधाच्या समांतर जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा, हे परिणामी रोध त्या जोडणीतील रोध किंवा रोधांच्या किमतीपेक्षा कमी आहे.
- ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात.
- प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते.
- परिपथातून वाहणारा एकूण प्रवाह स्वतंत्रपणे प्रत्येक प्रतिकारातून जाणाऱ्या प्रवाहांच्या बेरजेइतका असतो.
- जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीजही परिणामी रोधांच्या व्यस्तांकाइतकी असते.
इ. वरील पद्धतीने बल्ब जोडल्यास परिपथाचा परिणामी रोध:
`1/"R"_"P" = 1/"R"_1 + 1/"R"_2`
दिलेल्या माहितीनुसार,
R1 = 15 Ω, R2 = 30 Ω
∴ `1/"R"_"P" = 1/15 + 1/30`
∴ RP = 10 Ω
∴ परिपथाचा परिणामी रोध = 10 Ω.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
x1, x2, x3 परिमाणाचे तीन रोध विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जोडल्यास आढळणाऱ्या गुणधर्मांची यादी खाली दिली आहे. ते कोणकोणत्या जोडणीत जोडले गेले आहेत ते लिहा. (I - विद्युतधारा, V - विभवांतर, x - परिणामी रोध).
अ. x1, x2, x3 मधून I एवढी विद्युतधारा वाहते.
आ. x हा x1, x2, x3 पेक्षा मोठा असतो.
इ. x हा x1, x2, x3 पेक्षा लहान असतो.
ई. x1, x2, x3 यांच्या दरम्यानचे विभवांतर V सारखेच आहे.
उ. x = x1 + x2 + x3
ऊ. x = `1/(1/"x"_1 + 1/"x"_2 + 1/"x"_3)`
जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 80 Ω होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 Ω होतो. तर त्या रोधांच्या किंमती काढा.
