Advertisements
Advertisements
Question
संक्षिप्त टिपा लिहा:
ग्रामीण समाजाच्या समस्या
Short/Brief Note
Advertisements
Solution
- दारिद्र्य: दारिद्र्य ही सामाजिक-आर्थिक बाब आहे. समाजातील काही लोक त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा ते दारिद्र्यावस्थेत असतात. ग्रामीण भागातील बहुतांश लोक दरिद्री, बेरोजगार अवस्थेत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. ग्रामीण भागातील गरीब लोकांमध्ये लघु आणि अल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचा समावेश होतो.
- निरक्षरता: शहरी लोकसंख्येशी तुलना करता, ग्रामीण भागात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असते. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. यासाठी शासनाने काही विशेष तरतुदी (उदाहरणार्थ, सर्व शिक्षा अभियान) केल्या आहेत. मुले आणि प्रौढांमध्ये निरक्षरतेचे मोठे प्रमाण आजही कायम आहे. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी तुटपुंज्या तरतुदी हे त्यामागचे कारण होय. विविध कार्यक्रम अथवा तरतुदीं व्यतिरिक्त ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता ही चिंताजनक बाब आहे.
- पारंपरिकता, पुराणमतवाद आणि अंधश्रद्धा: भारत आजही पुराणमतवादी समाज आहे. येथील लोकांचे विचार आणि श्रद्धा पारंपरिक आहेत. पारंपरिक रूढी, धर्म, जीवनपद्धतीला आजही महत्त्व आहे. अशी जीवनपद्धती आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी ग्रामीण लोक प्रतिकार करतात. येथील लोक बदल सहज स्वीकारत नाहीत.
- जातिव्यवस्थेचा प्रभाव: जातिव्यवस्थेनुसार पारंपरिक हक्क, अधिकार आणि दंड या बाबी आज फारशा नजरेस पडत नाहीत. परंतु, जातिव्यवस्था लोकांच्या विचारांत इतकी भिनली आहे की, सामाजिक संबंध या व्यवस्थेमुळे आकार घेतात. असे असले तरी, दैनंदिन आयुष्यातील व्यवहारांमध्ये मात्र ग्रामीण लोक एकमेकांना सहकार्य करतात
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या: शेतकरी आत्महत्या ही समस्या प्रामुख्याने भारतात गंभीर स्वरूपाची आहे. याचे कारण असे की, येथील बहुतांश लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी व्यवसायावर आधारित आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी अधिक शेतकरी कर्जबाजारी होते. भारतातील कृषी क्षेत्रावर आर्थिक सुधारणांचा अंशतः सकारात्मक परिणाम झाला हे मात्र नक्की. या सुधारणांचे नकारात्मक परिणामही पहावयास मिळतात.
- स्त्रियांचे दुय्यम स्थान: कुटुंब, धर्म, रूढी आणि परंपरांच्या नियंत्रणामुळे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर पितृसत्ताक मूल्ये आणि पद्धतींचा पगडा आहे. यामुळे समाजात दुजाभाव निर्माण होतो आणि लिंगभावाबाबत ठाम मते तयार होतात.
- कौटुंबिक वाद: जमिनीच्या मालकीवरून ग्रामीण भागांमध्ये कौटुंबिक वाद होणे ही बाब नवीन नाही. अशा तंट्यांमुळे अनेक संयुक्त कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कुटुंबातील अनेक सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी झाल्याने जमिनीच्या तुकड्यांवर पिक घेणे शक्य होत नाही.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
