English

शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा.

Long Answer
Advertisements

Solution

  1. शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली.
  2. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला.
  3. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत, त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची तसेच जखमी सैनिकांची काळजी घेतली.
  4. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी चांगली वागणूक दिली. एकंदर शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती.

अशाप्रकारे, शिवाजी महाराजांनी सैन्याबाबतच्या धोरणात शिस्त, प्रामाणिकपणा आणि मानवता या तत्त्वांचे पालन केले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: आदर्श राज्यकर्ता - स्वाध्याय [Page 132]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11 आदर्श राज्यकर्ता
स्वाध्याय | Q २. (३) | Page 132
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×