मराठी

SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी - Maharashtra State Board Question Bank Solutions for Marathi [मराठी]

Advertisements
[object Object]
[object Object]
विषय
मुख्य विषय
अध्याय
Advertisements
Advertisements
Marathi [मराठी]
< prev  281 to 300 of 854  next > 

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. उत्तरे लिहा. (२)

1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी

  1. ___________
  2. __________

2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने (२)

  1. ___________
  2. ___________

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।

4. काव्यसाैंदर्य. (२)

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे भावसाैंदर्य स्पष्ट करा.

कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

[12] भरतवाक्य (कविता)
Chapter: [12] भरतवाक्य (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) खालील कृती सोडवा.  (2)

1)

दोन शब्दरूपे समान, उच्चार समान, अर्थ मात्र भिन्न असा शब्द.
 

2)

मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा.
 

 

'पुराणातली वांगी पुराणात' या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती 'पुराणातली वानगी पुराणात'. वानगी म्हणजे उदाहरणे. पण 'वानगी' झाली 'वांगी' आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.
उदाहरणार्थ,

  1. राजाचे 'कलेवर' प्रेम होते. २
  2. अपघातस्थळी कडेला एक 'कलेवर' पडले होते.

    येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे.

    आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
    आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे.
उदा., आता पाऊस पडत आहे. 'पाऊस पडणे' या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.

  1. पावसाने स्वत: जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली.
  2. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या 'मॉर्निंग वॉक' च्या बेतावर पाणी पडले.

    अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे, तिचे अर्थसाैंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...' असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खर्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.

२) खालील आकृती पूर्ण करा.  (2)

३) स्वमत -  (3)

लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा.

[2] बोलतो मराठी...
Chapter: [2] बोलतो मराठी...
Concept: undefined >> undefined

Advertisements

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________
[15.1] खोद आणखी थोडेसे (कविता)
Chapter: [15.1] खोद आणखी थोडेसे (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) का ते लिहा.  (2)

  1. आजी मुलांना गोठ्यातच दूध प्यायला लावायची....
  2. आजी सोप्यात बसून सक्त पहारा द्यायची....
        आमच्या घरी एक गावरान गाय होती. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न् ग्लास घेऊन लायनीत उभं राह्यचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत राह्यचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राह्यची. हातातील माळेचा एकेक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हांला गोठ्यात दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची; पण कामातनं कुणाची सुटका नसायची.

२) काय ते सांगा.  (2)

आजीचा कटाक्ष असावयाच्या त्या गोष्टी-

  1. ____________
  2. ____________

३) स्वमत-  (3)

तुमच्या घरामध्ये कामांची विभागणी कोण करते आणि कशी? ते सविस्तर लिहा.

[3] आजी : कुटुंबाचं आगळ
Chapter: [3] आजी : कुटुंबाचं आगळ
Concept: undefined >> undefined

१) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

i) चूक की बरोबर ते लिहा. (१)

  1. भाकरी करपल्या, की सरपण फोडणाऱ्याला आजी शिव्या द्यायची - 
  2. मुलांच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या -

ii) आकृतिबंध पूर्ण करा.  (१)

कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या, की करणारणीला लाखोली. सरपण नीट नसलं, की गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला, की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची न् आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही; पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसता बसता झोपी जाणार; पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं, की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या, सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा.

२) घटनांप्रमाणे ओघतक्ता पूर्ण करून लिहा.  (२)

स्वयंपाक झाला, की आधी बालगोपाळांची पंगत बसायची
______________________________
आजी धपाटे घालून खाऊ घालायची
________________________________
शेवटी सगळ्या बायका मिळून जेवत

३) स्वमत-  (३)

पाठाच्या आधारे एकत्र कुटुंबपद्धतीबद्दल तुमचे विचार स्पष्ट करून लिहा.

[3] आजी : कुटुंबाचं आगळ
Chapter: [3] आजी : कुटुंबाचं आगळ
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कसे ते लिहा.  (१)

अ) ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची पद्धत -

  1. ____________
  2. ____________

ब) एका शब्दात उत्तर लिहा. (१)

  1. लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र- ______
  2. लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षककवच - ______
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न् मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे,

२. काय ते सांगा.  (२)

उताऱ्यात आलेले बैठे खेळ-

  1. ____________
  2. ____________
  3. ____________
  4. ____________

३. स्वमत-  (३)

आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. लेखकाच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा.

[3] आजी : कुटुंबाचं आगळ
Chapter: [3] आजी : कुटुंबाचं आगळ
Concept: undefined >> undefined

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________
[16] आकाशी झेप घे रे (कविता)
Chapter: [16] आकाशी झेप घे रे (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

       सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची न् गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राह्यची. झोका खेळायची. उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव-शेव म्हणून खायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चा विहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवणापानी खेळायचं, चटके बसायला लागले, की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पाढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्ग दत्त वातावरणात बालपण आकारत होतं.
       गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू-ज्वारौचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्ण्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची- पात्रंची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या-मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो. भांडत होतो. पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजंत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो.

२) एका शब्दात उत्तर लिहा.  (२)

  1. लेखकाची लहानपणी अभ्यास करण्याची जागा - ______
  2. लेखकाला लहानपणी मिळालेली मायेची सावली - ______

३) स्वमत-  (३)

तुम्हांला आठवत असलेल्या कोणत्याही एका अविस्मरणीय प्रसंगाचे वर्णन करा.

[3] आजी : कुटुंबाचं आगळ
Chapter: [3] आजी : कुटुंबाचं आगळ
Concept: undefined >> undefined

खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।

[12] भरतवाक्य (कविता)
Chapter: [12] भरतवाक्य (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कारण लिहा.  (२)

  1. झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली...
  2. गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण...

हिवाळा नुकताच सुरू झालेला होता.
झाडावरून एकामागोमाग एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट... पट...पट...
त्यांचा तो पट...पट... असा कर्णकटू आवाज...
     तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले.
    ’पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की!“
    पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ’अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!“ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
    ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला.

२) दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा. (ओघतक्ता तयार करा.) (२)

विधाने-

अ) पान धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.

ब) गवताच्या पात्याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला.

क) हिवाळा सुरू झाला होता.

ड) चिमणे गवताचे पाते जागे झाले.

३) स्वमत-  (३)

रूपक कथेची वैशिष्ट्ये प्रस्तुत रूपककथेद्वारे स्पष्ट करा.

[7] गवताचे पाते
Chapter: [7] गवताचे पाते
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

       पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ’अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!“ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
       ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
       ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, 'काय ही हिवाळ्यातली पानं! जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज... छी छी छी! माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!'

२) परिणाम लिहा.  (२)

  1. वसंताच्या संजीवक स्पर्शाने गळून पडलेल्या पानाला स्पर्श केला. 
  2. हिवाळा सुरू झाल्याचा परिणाम...

३) स्वमत कृती -  (३)

कथेत दिसून येणारे मानवी गुणधर्म स्पष्ट करा.

[7] गवताचे पाते
Chapter: [7] गवताचे पाते
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील आकृती पूर्ण करा. (२)

              स्वातंत्र्यसमराच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे १८ एप्रिल, १८५८ रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यांदेखत कमावले गेले; पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते, हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावरसुद्धा ती गुलामच राहील, हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे, की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र, खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते, की ती आपल्या गुलामीला दागिना मानीत असे! आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे, असे भासवले जात असेलही; पण, तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब, तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे, हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते! तथापि, हे कार्य अतोनात कठीण आहे, हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे, असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल, याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते! नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले, तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल, हे कळत होते.

2. का ते लिहा. (२)

स्त्रीने शिक्षित व्हायलाच पाहिजे असे कर्व्यांना ठामपणे वाटत होते, कारण .......

3. स्वमत (३)

'२१ व्या शतकातील स्त्री' याविषयी तुमचे विचार लिहा.

[13] कर्ते सुधारक कर्वे
Chapter: [13] कर्ते सुधारक कर्वे
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. एका शब्दात उत्तर लिहा.  (२)

  1. थंडी कमी होण्याची वेळ- ______
  2. लहानपणी लेखिका आणि त्यांच्या भावंडांना गॅलरीत झोपायला मिळायचं तो महिना - ______

     होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर; पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हांला गॅलरीत झोपायला मिळायचं.
     रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले, की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, 'उद्या कोकिळेचं 'कुहू' ऐकू येईल का? बघू हं!' पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो 'कुहूऽकुहूऽ' आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं.
     सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!

२. वैशिष्ट्ये लिहा.  (२)

लेखिकेने अनुभवलेल्या सुट्टीचे वेगळपण

३. स्वमत कृती-  (३)

उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट तुम्ही पाहता का? कसे ते स्पष्ट करा.

[8] वाट पाहताना
Chapter: [8] वाट पाहताना
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. कृती करा. (२)

१. 

महर्षी कर्वे यांची उताऱ्यात आलेली गुणवैशिष्ट्ये _____________________
_____________________
           पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यांतून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवाविवाह होऊ शकतो, हे दाखवून दिले. स्वत: विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्रा. धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ 'सत्पुरुषांचा छळ करावा', एवढेच 'ऐतिहासिक कार्य' तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट, जिथे फाटला तिथे, शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे, संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला

2. (१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (१)

1. अज्ञ समाजाचे ऐतिहासिक कार्य ____________

अ) सत्पुरुषांचा विरोध करणे.
ब) सत्पुरुषांचा सन्मान करणे.
क) सत्पुरुषांचा छळ करणे.
ड) सत्पुरुषांकडे पाठ फिरवणे.

(२) 'गणित' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (१)

3. स्वमत. (३)

'कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

[13] कर्ते सुधारक कर्वे
Chapter: [13] कर्ते सुधारक कर्वे
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

      सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!
      आमच्या भल्यामोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली, तरी आख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. ते सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स!
      आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ्ठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची...

२) कारण लिहा.  (२)

  1. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण...
  2. उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं ...

३) स्वमत कृती-  (३)

पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं भेटतात; लेखिकेच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा.

[8] वाट पाहताना
Chapter: [8] वाट पाहताना
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)

          भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत 'माता' म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ.स. १९१६ साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणार्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती.

2. उत्तर लिहा. (२)

भारतातील समाजाला चीड आणणारा विरोधाभास

  1. ______
  2. ______

3. स्वमत (३)

'स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल' या विधानातील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

[13] कर्ते सुधारक कर्वे
Chapter: [13] कर्ते सुधारक कर्वे
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) तुलना करा.  (२)

व्यक्तीशी मैत्री कवितेशी मैत्री
   
   

 

      पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधीपण, केव्हापण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री-मध्यरात्रीसुद्धा; पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची.
     मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं-अस्वस्थ होणं-कशातच मन लागेनासं होणं-आई, आत्याची ती बोलणी खाणं! आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं.
     आमची आत्या तेव्हा उरुळीकांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरूळीला सहल जाण्याजोग वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच, गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ-साडेनऊसुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली, की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होत आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं; पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची.

२) ओघतक्ता तयार करा.  (२)

लेखिकेच्या आत्याच्या दररोजच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.

३) स्वमत -  (३)

तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या वाट पाहण्याचा तुम्हांला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

[8] वाट पाहताना
Chapter: [8] वाट पाहताना
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. उत्तर लिहा. (२)

गणिताचा गुणधर्म: ______
अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव: ______

              महर्षी कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रमा' ची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' असे त्यांनी तिचे नामांतर केले. 'पै पै चा निधी' व 'मुरुड निधी' त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की यांतील पै पै चा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे! कर्व्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव! कर्वे स्वत: मोटार वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे, आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वत:च्याच विश्वात वावरतात, अशी कुरबूर, घरच्यांच्या मनांत घर करून राहिली होती. वस्तुत: समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती; पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही! नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत. विचार करत. विचार पक्का झाला, की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई, की त्यांच्या चित्तात काय चालले आहे! हे डावपेच नव्हते; उलटपक्षी, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे, हेच श्रेयस्कर असते!

2. का ते लिहा. (२)

महर्षी कर्वे यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला समाज धजावला नाही .....

3. स्वमत (३)

'बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते' याविषयी तुमचे मत उताऱ्याच्या आधारे लिहा.

[13] कर्ते सुधारक कर्वे
Chapter: [13] कर्ते सुधारक कर्वे
Concept: undefined >> undefined

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)

खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.

4. काव्यसाैंदर्य. (२)

'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.

[15.1] खोद आणखी थोडेसे (कविता)
Chapter: [15.1] खोद आणखी थोडेसे (कविता)
Concept: undefined >> undefined

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कोष्टक पूर्ण करा.  (२)

श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची।।१।।

वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेंऊ नये। येकायेकीं।।२।।

जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।३।।

तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।।४।।

आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करूं नये। कार्य कांही।।५।।

सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं नये। कांहीं केल्या।।६।।

कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वासघात।।७।।

व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये।
आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी।।८।।

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।।९।।

अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।।१०।।

२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.  (२)

क्र. गोष्टी उत्तर दक्षता
i. आळस ______ मानू नये.
ii. परपीडा ______ वागू नये.
iii. सत्यमार्ग ______ नये.
iv. सभेतील वर्तन ______ नये.

३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।

४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.  (२)

तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।

[4] उत्तमलक्षण (संतकाव्य)
Chapter: [4] उत्तमलक्षण (संतकाव्य)
Concept: undefined >> undefined
< prev  281 to 300 of 854  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Question Bank Solutions
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी English (Second/Third Language)
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Geography [भूगोल]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Hindi - Composite [हिंदी - संयुक्त]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Marathi [मराठी]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Sanskrit (Second Language) [संस्कृत (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Sanskrit - Composite [संस्कृत - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) इयत्ता १० वी Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×