मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. झुळुकेची परोपकारी वृत्ती

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

झुळुकेची परोपकारी वृत्ती

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कवितेतील मुलाला झुळूक बनायचे आहे. झुळूक बनून मन ओढ घेईल तिथे त्याला स्वच्छंदपणे विहरायचे आहे. बाजारात, नदीकाठी, बागेत, अगदी पडक्या वाड्यापाठीही त्याला फेरफटका मारायचा आहे; पण अशा विविध गमतीजमती करता करता त्याला झुळूक बनून इतरांना उपयोगी ठरतील अशीही कामे करायची आहेत.

त्या झुळूकेला बागेत जाऊन कळीला हळूवार स्पर्श करायचा आहे. तिच्या या कृतीने कळी फुलणार आहे व तिचे फूल बनल्यावर त्यातील सुगंध सोबत नेऊन झुळकीला तो सर्वत्र उधळून द्यायचा आहे, वातावरण सुगंधी करायचे आहे. इतरांतील चांगुलपणाचा दरवळ सर्वत्र पसरवून एखादे चांगले काम करण्याची, इतरांना मदत करण्याची झुळकेची वृत्ती यातून दिसून येते.

याशिवाय, झुळकेला झऱ्याचा झुळझुळ असा मंजुळ नाद, गाण्याची एखादी अर्धवट गुणगुणलेली तान सर्वत्र पसरवायची आहे. शेतावरून व नदीवरून तरंग उठवत जायचे आहे. आपल्या हळूवार स्पर्शाने त्यांच्यातही चैतन्य निर्माण करायचे आहे. हीच झुळूक बांबूच्या वनातून बासरीसमान स्वर निर्माण करत, शेतातील कणसांना स्पर्श करत, बकुळफुले डोहात शिंपत व जांभळांचा नदीकाठावर सडा पाडत जाणार आहे. म्हणजे, ही झुळूक जिथे जाईल तिथे आनंद निर्माण करणार आहे.

दिवसभर अथक परिश्रम करून, थकूनभागून येणाऱ्या व्यक्तीचा शीण, थकवा घालवण्यासाठी ती त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून त्याला प्रसन्न, ताजेतवाने करणार आहे. एखाद्याच्या आयुष्यात चैतन्य, आनंद, उत्साह, आशा, नवी उमेद भरण्याचे कार्य करणारी अशी ही झुळूक नक्कीच परोपकारी वृत्तीची आहे असे मला वाटते.

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: झुळूक - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 9 झुळूक
खेळूया शब्दांशी | Q (इ)(अ) | पृष्ठ ३४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 9 झुळूक (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (इ) (अ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

पसरणारा सुवास → कशाचा ______

चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.

अमूल्य शिकवण → कोणाची ______

कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______


कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अस्तित्वाची- 


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

इच्छा -


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

अखंड -


खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.

आकाश -


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई

जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।


खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

इमान आम्हा एकच ठावे 
घाम गाळुनी काम करावे


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

चुकलीमुकली लकेर -


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पाचूचे मखमली शेत -


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×