Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
‘अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा’ प्रसिद्ध झाला.
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
- वसाहतींवर स्टॅम्प कायदा तसेच इतर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. इंग्लंडकडून अमेरिकन वसाहतींना अन्यायकारक वागणूक दिली जात होती.
- वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावेत, वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करण्याची स्वायत्तता द्यावी अशी मागणी तेथील नागरिक करू लागले. इंग्लंडने याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला.
- बोस्टन येथील लोकांनी निषेध म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या.
- १७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथे काँग्रेसचे अधिवेशन बोलावण्यात आले. ब्रिटिश वस्तूंच्या आयातीला तीव्र विरोध करण्यात आला आणि ब्रिटिश उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविण्यात आले.
- ४ जुलै १७७६ रोजी थॉमस जेफरसन यांनी लिहिलेला “स्वातंत्र्याचा जाहीरनामा” स्वीकारण्यात आला.
- या घटनांमुळे युरोपीय सत्तांविरुद्ध अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीला वेग मिळाला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
