मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

             संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.

1. योग्य जोड्या लावा. (2)

  'अ' गट 'ब' गट
i. सूर्य पाणी
ii. मेघ वस्त्र
iii. शेतकरी प्रकाश
iv. विणकर धान्य

2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
  2. आपले पोषण करणारी - ______
थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

1. 

  'अ' गट 'ब' गट
i. सूर्य प्रकाश 
ii. मेघ पाणी 
iii. शेतकरी धान्य
iv. विणकर वस्त्र

2. 

  1. संयम
  2. सृष्टी
shaalaa.com
अपठित गद्यांश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2019-2020 (March) Official

संबंधित प्रश्‍न

अपठित गद्य

प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस -
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे -

(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे -

(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक -

जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून  शिकण्यासाठी बाहेर जायला  हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’

(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.

(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.


(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

(अ) तक्ता पूर्ण करा.

जंगलाचा स्वभाव  माणसाचा स्वभाव
(१) ______ (१) ______
(२) ______ (२) ______

 

जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांद्या, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.

-राजा मंगळवेढेकर.

(आ) चौकटी पूर्ण करा.

(इ) खालील कृती करा.

(१) खालील शब्दांची जात ओळखा.

(i)  
(ii) 

(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा. - कोपरे : `square` पाने : पान

  • स्वमत.
    जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. उत्तर लिहा. (०२)

  1. ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
  2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.

२. आकलन कृती 

  १. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (०२)


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
  2. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२. आकलन कृती 

  १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) उत्तर लिहा.  (२)

  1. ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
  2. फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?

पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते.

नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य!

या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात.

२) पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (२)

  ←नव्या पिढीला माणूसपणाच्या सुंदरतेकडे नेणारे→  

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) एका वाक्यात उत्तरे लिहा.  (२)

  1. परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
  2. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाई तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत.

ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

२) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (२)

  1. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवा ______
  2. हृदयाला आनंद बहाल करणारा ______

उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

१. आकृती पूर्ण करा. (२)

आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात्‌ ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.

बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा. लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते.

आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतल त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जीवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला.

२. योग्य जोड्या लावा: (२)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) भंगलेली (i) भाकर
(ii) खचलेली (ii) जीवने
(iii) कष्टाने मिळवलेली (iii) मने
(iv) झाकोळलेली (iv) शरीरे

३. व्याकरण:

(i) खालील वाक्यांतील विशेषणे शोधून लिहा: (१)

(अ) त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली.

(ब) त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.

(ii) खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा: (१)

(अ) तू

(ब) तुझा

४. स्वमत: (२)

‘सुंदर मी करणार’ या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (2)

           सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते.

2. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______
  2. सौजन्यातून व्यक्त होणारे - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) शेती प्रकाश
(ii) सूर्य वस्त्र
(iii) वृक्ष हंगाम
(iv) पैठणी ओंबी
(v) भात पाने

 

           शेतीभातीचे ते दिवस व कापणीचा हंगाम, अगोदरच त्या गावाला झाडी अतोनात, तशात प्रातःकाळचा तो वेळ, सूर्य नुकताच वर आला होताच त्याचे कोवळे ऊन पावसाने आपल्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून टवटवीत केलेल्या वृक्षांची हिरवीगार पाने अधिक सतेज दिसत होती. सभोवार कणसांवर आलेली विस्तीर्ण शेतेच दृष्टीस पडत होती. आमच्या पायांपासून तो थेट समोरच्या डोंगरापर्यंत पिवळसर हिरव्या रंगाचे गालिचेच पसरले आहेत की काय असा भास होई. मधून-मधून नाचण्यांची हिरवीगार शेत दिसत, त्यामुळे असा भास होई की, सृष्टिदेवी हिरव्या बुट्टयांनी युक्त अशी पिवळी पैठणीच नेसून विहार करीत आहे. आत दाणा झाल्याकारणाने शेतातील भाताच्या ओंब्या अगदी वाकून गेल्या होत्या. नाना तऱ्हेचे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी मंजूळ गायन करीत इकडून-तिकडे उडून जाताना दृष्टीस पडत आणि शेतामधून काम करणारी माणसेही मधून-मधून दिसत, शीतल व सुवासिक फुलांच्या वासाने सुगंधित असा वारा झुळझुळ वाहत होता. तो शेतावरून वाहताना समुद्रावर वर खाली होणाऱ्या लाटांप्रमाणे त्या शेतांची शोभा दिसत होती. वारा लागून त्या ओंब्याचा जो सळसळ आवाज होई तो किती मनोहर!

२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)

  1. पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - ______
  2. मंजूळ गायन करणारे - ______

(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.

(अ) वैशिष्ट्ये लिहा.

विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते.

(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.

घटना/कृती परिणाम
(१) झाडाची मुळे खोल जाणे. (१) ____________
(२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. (२) ____________

(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -

(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.

(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) हिरा विद्वान
(ii) शिल्पकार श्रोतृगण
(iii) विषयतज्ज्ञ खाण
(iv) भाषण प्रबुद्ध
(v) प्रौढ शिल्पकला

 

           मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्‍तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही.

२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)

  1. गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
  2. खाणीतून निघणारे - ______

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) चंदीपूर चेन्नई
(ii) अण्वस्त्र चाचण्या शिक्षणाची सोय
(iii) अण्णा युनिव्हर्सिटी ओरिसा
(iv) खेड्यापाड्यात जावेद मियाँदाद
(v) लहान पोरगा डॉ. कलाम

 

       त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे.

       मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते.

       “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे.

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
  2. लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______

पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. ‘तू तुझ्या वेळेला ये मी कामाला सुरुवात करतो’ असे म्हणून ते तिथे पोहोचले, पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं.

हेमलकशाची जगा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फूरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्याना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाड तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी “तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात? असा आक्षेप घेणं सुरु केलं. बाबा म्हणाले, “कागदोपत्री जागा माझी आहे त्यावर ते म्हणाले,” पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही” ते ऐकेनात, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.

खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकाऱ्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढलां, “झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा” असं त्यांनी वनाधिकाऱ्याला सुचवलं. वनाधिकाऱ्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किमत ठरवली! तेवढी दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं.

(१) (2)

  1. २३ डिसेंबर १९७३
  2. वनाधिकाऱ्याचा आक्षेप

(२) खालील कृती करा. (2)

  1. बाबा आमटे यांनी आपली ‘महारोगी सेवा समिती’ या जागेवर सुरुवात केली - ______
  2. अधिकारी, ज्याने वनखात्याच्या अडचणीतून मार्ग काढला - ______

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)

(य) ______

(र) ______

           मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा.

- गिरिजा किर

(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)

(य) ______

(र) ______


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

         अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.

माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.


ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विविध ॲप्स कोणते? त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले - खुपले, की ती कावरी - बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रृतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल.

2. कधी ते लिहा:  (2)

  1.  आई कावरीबावरी होते - ______
  2. आई थकणार नाही - ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×