Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
1. योग्य जोड्या लावा. (2)
| 'अ' गट | 'ब' गट | |
| i. | सूर्य | पाणी |
| ii. | मेघ | वस्त्र |
| iii. | शेतकरी | प्रकाश |
| iv. | विणकर | धान्य |
2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
- आपले पोषण करणारी - ______
Advertisements
उत्तर
1.
| 'अ' गट | 'ब' गट | |
| i. | सूर्य | प्रकाश |
| ii. | मेघ | पाणी |
| iii. | शेतकरी | धान्य |
| iv. | विणकर | वस्त्र |
2.
- संयम
- सृष्टी
APPEARS IN
संबंधित प्रश्न
(अ) उतारा वाचून दिलेली कृती करा.
(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.
(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ______
(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ______
(२) स्पष्ट करा.
(अ) पाणी समजूतदार वाटते ______
(आ) पाणी क्रूर वाटते ______
|
वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? - राजा मंगळवेढेकर |
(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
| (१) | ![]() |
| (२) | ![]() |
(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.
| वाक्य | अव्यय | अव्ययाचा प्रकार |
| (१) पाणी कुठे गच्चीवर लोळते. | ______, ______ | ______, ______ |
| (२) पाणी येते आणि जाते. | ______ | ______ |
- उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
- वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२. आकलन कृती
१. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (०१)
अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.
ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.
ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक ______ (०१)
अ) गुंतलेली गोष्ट असते.
ब) विखुरलेली गोष्ट असते.
क) अंतरावरील गोष्ट असते.
ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.
| दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
२. आकलन कृती
१. वैशिष्ट्ये लिहा. (०२)
खऱ्या नात्यामधील संवेदना
- ______
- ______
- ______
- ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाई तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवा ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) चौकटी पूर्ण करा: (2)
(य) अर्थयुक्त असणारे - ______
(र) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडतो तो - ______
|
साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हे ही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपकप्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या साहाय्याने साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किंवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो. मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिमाण दिलेले असते; तर शब्दांच्या अर्थांतून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिमाण दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तीची मने, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थांतून व्यक्त झालेले असतात. व्यक्तींना, व्यक्तिसमूहांनां सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात 'बोलणे' हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे. निर्देशात्मक, भावनात्मक, विचारप्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर असे असू शकते. - वसंत आबाजी डहाके |
(२) खालील कृती करा: (२)
माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा:
(य) ______
(र) ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| (i) | चंदीपूर | चेन्नई |
| (ii) | अण्वस्त्र चाचण्या | शिक्षणाची सोय |
| (iii) | अण्णा युनिव्हर्सिटी | ओरिसा |
| (iv) | खेड्यापाड्यात | जावेद मियाँदाद |
| (v) | लहान पोरगा | डॉ. कलाम |
|
त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे. मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते. “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे. |
२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
- लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

|
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.” रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’ |
(2) जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) दारावर भिक्षा मागायला येणारा | (1) रुक्मिणीबाई |
| (ii) भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या | (2) विनोबा |
| (iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे | (3) भिक्षेकरी |
| (iv) मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणाऱ्या | (4) रुक्मिणीबाई |
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

|
माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून. कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले. अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते. |
(2) चौकटी पूर्ण करा. (2)
- कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - ______
- कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - ______
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)
(य) ______
(र) ______
|
मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा. - गिरिजा किर |
(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)
(य) ______
(र) ______
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातऱ्हांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. खडक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला. |
चौकटी पूर्ण करा.
अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू - ______, ______, ______, ______.
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
| मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. |
- आकृतिबंध पूर्ण करा: (2)

- टीप लिहा: (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. आकृतिबंध पूर्ण करा: (2)

| मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले - खुपले, की ती कावरी - बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रृतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल. |
2. कधी ते लिहा: (2)
- आई कावरीबावरी होते - ______
- आई थकणार नाही - ______


