Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (१)
अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात.
ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते.
ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक _____ (१)
अ) गुंतलेली गोष्ट असते.
ब) विखुरलेली गोष्ट असते.
क) अंतरावरील गोष्ट असते.
ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते.
| दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बर्याचदा आपल्य दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
२) वैशिष्ट्ये लिहा. (२)
खऱ्या नात्यामधील संवेदना
- ______
- ______
- ______
- ______
Advertisements
उत्तर
१)
i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.
ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते.
२) खऱ्या नात्यामधील संवेदना-
- विखुरलेली नसते.
- विभागलेली नसते.
- एकात्म असते.
- आपण नात्यात या संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस - 
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे - 
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे - 
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक - 
जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिकण्यासाठी बाहेर जायला हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’
(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.

(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२. आकलन कृती
१. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
1. योग्य जोड्या लावा. (2)
| 'अ' गट | 'ब' गट | |
| i. | सूर्य | पाणी |
| ii. | मेघ | वस्त्र |
| iii. | शेतकरी | प्रकाश |
| iv. | विणकर | धान्य |
2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
- आपले पोषण करणारी - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तर लिहा. (२)
- ग्रंथपालांना काय संबोधले आहे?
- फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो?
|
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
२) पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (२)
| ←नव्या पिढीला माणूसपणाच्या सुंदरतेकडे नेणारे→ |
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
- परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे.
- झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाई तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
२) सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (२)
- पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवा ______
- हृदयाला आनंद बहाल करणारा ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

| अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. |
(2) कधी ते लिहा: (2)
- आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही.
- आजारी, संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) चौकटी पूर्ण करा: (2)
(य) अर्थयुक्त असणारे - ______
(र) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडतो तो - ______
|
साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हे ही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपकप्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या साहाय्याने साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किंवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो. मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिमाण दिलेले असते; तर शब्दांच्या अर्थांतून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिमाण दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तीची मने, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थांतून व्यक्त झालेले असतात. व्यक्तींना, व्यक्तिसमूहांनां सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात 'बोलणे' हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे. निर्देशात्मक, भावनात्मक, विचारप्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर असे असू शकते. - वसंत आबाजी डहाके |
(२) खालील कृती करा: (२)
माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा:
(य) ______
(र) ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)

|
सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. |
2. चौकटी पूर्ण करा. (2)
- सुजनांकडून अपेक्षित असलेले - ______
- सौजन्यातून व्यक्त होणारे - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| (i) | हिरा | विद्वान |
| (ii) | शिल्पकार | श्रोतृगण |
| (iii) | विषयतज्ज्ञ | खाण |
| (iv) | भाषण | प्रबुद्ध |
| (v) | प्रौढ | शिल्पकला |
| मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. |
२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)
- गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
- खाणीतून निघणारे - ______
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. ‘तू तुझ्या वेळेला ये मी कामाला सुरुवात करतो’ असे म्हणून ते तिथे पोहोचले, पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं. हेमलकशाची जगा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फूरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्याना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाड तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी “तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात? असा आक्षेप घेणं सुरु केलं. बाबा म्हणाले, “कागदोपत्री जागा माझी आहे त्यावर ते म्हणाले,” पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही” ते ऐकेनात, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकाऱ्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढलां, “झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा” असं त्यांनी वनाधिकाऱ्याला सुचवलं. वनाधिकाऱ्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किमत ठरवली! तेवढी दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं. |
(१) (2)
- २३ डिसेंबर १९७३
- वनाधिकाऱ्याचा आक्षेप
(२) खालील कृती करा. (2)
- बाबा आमटे यांनी आपली ‘महारोगी सेवा समिती’ या जागेवर सुरुवात केली - ______
- अधिकारी, ज्याने वनखात्याच्या अडचणीतून मार्ग काढला - ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

|
दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. एके दिवशी एक धडधाकट भिकारी आला असता रुक्मिणीबाई त्याला भिक्षा घालू लागल्या. विनोबा त्यांना म्हणाले, “हा तर धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा देत गेलो, तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान केले, तर त्यामुळे दान देणाऱ्याचेही अकल्याण होते.” रुक्मिणीबाईंनी ते शांतपणे ऐकले आणि म्हणाल्या, “विन्या, पात्र-अपात्र यांची परीक्षा करणारे आम्ही कोण? दारावर आलेला प्रत्येक माणूस परमेश्वररूप समजून त्याला शक्तिनुसार देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण”? विनोबांनी त्यावर टिपणी केलीय, की ‘आईच्या या युक्तिवादावर विन्याला दुसरा, युक्तिवाद सुचला नाही.’ |
(2) जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) दारावर भिक्षा मागायला येणारा | (1) रुक्मिणीबाई |
| (ii) भिकाऱ्याला भिक्षा घालणाऱ्या | (2) विनोबा |
| (iii) आईच्या युक्तिवादावर टिपणी करणारे | (3) भिक्षेकरी |
| (iv) मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणाऱ्या | (4) रुक्मिणीबाई |
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे - (२)
(य) ______
(र) ______
|
मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री, पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे. अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र! बाकीची जाग-जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्त्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं, समुद्राशी माझा संवाद चालायचा. - गिरिजा किर |
(२) ‘पाण्यावर सांडलेलं चांदण पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था - (२)
(य) ______
(र) ______
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विविध ॲप्स कोणते? त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
प्रचंड बुंधा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोहरानातून तळ्याकडं उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढ रम्य वाटतं. माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे. ते माझं भाग्य आहे, वनांच्या सावलीत मी वाढलोय. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पढविलयं. वृक्षांइतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलयं. झाडं जशी सूर्यप्रकाश व दव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलय. पानं गळतात. फुलं कोमेजतात. पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली. मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनांतील पावित्रय जाणाव, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. |
(१) चौकटी पूर्ण करा - (२)
रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती -
(य) ______
(र) ______
(२) कारणे लिहा - (२)
आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे, कारण -
(य) ______
(र) ______
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
| मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. |
- आकृतिबंध पूर्ण करा: (2)

- टीप लिहा: (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. आकृतिबंध पूर्ण करा: (2)

| मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले - खुपले, की ती कावरी - बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रृतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल. |
2. कधी ते लिहा: (2)
- आई कावरीबावरी होते - ______
- आई थकणार नाही - ______
