Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______
- अलगद उतरणारे थेंब - ______
2. आकृती पूर्ण करा. (2)

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- मुकाट -
- मुसाफिर -
- संथ -
- मौन व्रत -
4. काव्यसाैंदर्य: (2)
'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
1.
- मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - झाड
- अलगद उतरणारे थेंब - दवबिंदू
2.

3.
- शांत
- प्रवासी/ वाटसरू
- सावकाश/मंद
- काहीही न बोलणे
4. वरील काव्यपंक्ती जॉर्ज लोपीस यांच्या 'हिरवंगार झाडासारखं' या कवितेतील आहे. सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही न डगमगता पाय रोवून राहण्याचा खंबीरपणा हे झाडाचे गुण आपणही आपल्यामध्ये आणावेत असा संदेश कवी देत आहे.
झाड आपल्याला सळसळत्या पानासारखे मनमोकळे हसायला शिकवते. मातीत घट्ट पाय रोवून उभे असणारे झाड आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती शिकवते, मातीत रुजण्याची, मुरण्याची कला शिकवते. हिरवेगार झाड आपल्याला जगायचे कसे हे शिकवते, तर रोज शांत चित्ताने चिंतन करण्याची कलाही झाडच शिकवते. असा विचार वरील ओळींद्ववारे कवी व्यक्त करतात. झाड जणू काही मानवाप्रमाणे विविध कृती करत आहे अशी वेगळी कल्पना येथे केली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वाक्य पूर्ण करा.
कवीने झाडाला दिलेली उपमा-
वाक्य पूर्ण करा.
अलगद उतरणारे थेंब-
वाक्य पूर्ण करा.
पानझडीनंतरचे, नवी वस्त्रेधारण करणारे झाड म्हणजे-
वाक्य पूर्ण करा.
फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ-
एका वाक्यात उत्तरे लिहा.
झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?
‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
हसावं कसं सळसळत्या पानासारखं.
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’
‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा.
‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. गुण (०८)
१. चौकट पूर्ण करा. (०२)

|
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
२. चौकट पूर्ण करा. (०२)
१. खालील गोष्टी पाहून कवीच्या मनात आलेले विचार लिहा.
अ. हिरवा रंग
आ. झाडांचे बाहु
२. संकल्पना स्पष्ट करा. (०१)
दव
३- शब्दांचे अर्थ
१. कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ सांगा. (०२)
- गाणे -
- झाड -
- नवरी -
- पक्षी -
४- काव्यसाैंदय
१. ‘अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’ या ओळीतील विचारसाैंदर्य सांगा. (०२)
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
| (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (२) कवितेचा रचनाप्रकार - | |
| (३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
| (४) कवितेचा विषय - | |
| (५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
| (६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर। अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) खुडलेल्या - |
| (ii) पालवी - | |
| (iii) मरगळ - | |
| (iv) मंजुळ - |
