मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात.
  2. शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशींचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.
  3. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाउस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.
  4. पीक विमा संरक्षण, उत्पादित मालाची खरेदी इत्यादी बाबींमध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करते.
shaalaa.com
भारतातील काही उद्योग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×