मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सौर पॅनेलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात.
  2. यातून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवण्यात येतात.
  3. ज्या वेळी दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडले जातात, तेव्हा दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते, मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही.
  4. ज्या वेळी दोन सौर घट समांतर पद्धतीने जोडले जातात, तेव्हा दोन्ही घटांच्या विदयुतधारांची बेरीज होते, मात्र विभवांतर चे बेरीज होत नाही.
  5. अनेक सौर पॅनेल पुन्हा एकसर आणि समांतर रितीने जोडून पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते.
  6. अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो.
  7. या प्रकारे सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती निर्माण करता येते.
shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
स्वाध्याय | Q 9. आ. | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्‍न

सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?


सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.


नामनिर्देशित आकृती काढा.

एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.


सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.


वेगळा घटक ओळखा.


सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________


सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.


इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.


फरक स्पष्ट करा.

सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×